पोलिस उपायुक्तांच्या दालनात  तक्रारदार महिलेचा विष पिण्याचा प्रयत्न वाचा कुठे घडली घटना..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 March 2020

. पीडितेने पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली. परंतु, कारवाई होत नसल्याची भावना झाल्याने १६ मार्चला विषारी द्रव घेऊन पीडिता पोलिस आयुक्तालयात आली. तिच्यासोबत तिचे इतर नातेवाईक होते. ते उपायुक्त मीना मकवाना यांच्या दालनात गेले. तेथे मकवाना यांच्याशी चर्चा सुरू असतानाच पीडितेने विषारी द्रव पिण्याचा प्रयत्न केला. ही बाब एका पोलिस कर्मचाऱ्याने पाहिली. त्या कर्मचाऱ्याने तात्काळ पीडितेला रोखले.

औरंगाबाद : घरात घुसून लाठ्या काठ्यांनी मारहाण व विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असूनही संशयितांवर वाळूज पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करीत ४५ वर्षीय पीडितेने पोलिस आयुक्तालयात उपायुक्तांच्या दालनात विषारी द्रव प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सोमवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास घडला. 

दहेगाव बंगला (ता. गंगापूर) येथील एका पीडितेने १० मार्चला वाळूज ठाण्यात घरात घुसून लाठ्या काठ्यांनी मारहाण झाल्याची व विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार दिली.

 

हेही वाचा :   पुन्हा टिवटिव : अमृता फडणवीस कोणाला म्हणाल्या, 'झाले गेले विसरूनी जावे... 

राजेच म्हणतात शिवजयंती एकच असावी

या प्रकरणी ठाण्यात गुन्ह्याचीही नोंद करण्यात आली. पण वाळूज पोलिस कारवाई करीत नसल्याचा महिलेचा आरोप आहे. पीडितेने पोलिस उपायुक्तांकडे धाव घेतली. परंतु, कारवाई होत नसल्याची भावना झाल्याने १६ मार्चला विषारी द्रव घेऊन पीडिता पोलिस आयुक्तालयात आली.

 हेही वाचा :  धनंजय मुंडे, ऐका ना तूर उत्पादकांचा आक्रोश 

तुमचा विवाह कधी झालाय... बघा जमतेय का काही... 

तिच्यासोबत तिचे इतर नातेवाईक होते. ते उपायुक्त मीना मकवाना यांच्या दालनात गेले. तेथे मकवाना यांच्याशी चर्चा सुरू असतानाच पीडितेने विषारी द्रव पिण्याचा प्रयत्न केला. ही बाब एका पोलिस कर्मचाऱ्याने पाहिली. त्या कर्मचाऱ्याने तात्काळ पीडितेला रोखले.

हेही वाचा :  निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!

त्यानंतर पोलिसांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती ठिक आहे. १० मार्च रोजी गुन्हा नोंद झाल्यापासून १६ मार्चपर्यंत वाळूज पोलिसांनी कारवाई केली नव्हती असे पीडितेचे म्हणणे आहे. या घटनेमुळे आयुक्त कार्यालयात काही वेळ एकच धावपळ उडाली होती. 

गणेश राऊत आणि विक्रम राऊत हे सावत्र भाऊ आहेत. त्यांचा अंतर्गत व राजकारणातील कलह अनेक दिवसांपासून आहे. त्यांच्यावर परस्परविरोधी गुन्हे नोंद आहेत. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यात सोमवारी (ता. १६) संशयित आरोपींनी अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले. 
- संदीप गुरमे, पोलिस निरीक्षक, वाळूज ठाणे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News In The Dcp Room Woman Attempt To Drink Poison