esakal | बुडाला लागलेल्या तिजोरीत जमा झाले १९ कोटी रुपये!
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यापासून वसुलीचा वेग वाढला आहे. त्यामुळे दोन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १९ कोटी रुपये जमा झाले आहेत.

बुडाला लागलेल्या तिजोरीत जमा झाले १९ कोटी रुपये!

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद - तिजोरीत खडखडाट असल्यामुळे महापालिकेवर अनेकवेळा खाते मायनसमध्ये गेल्याची नामुष्की ओढावली. मात्र आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यापासून वसुलीचा वेग वाढला असून, कंत्राटदारांच्या बिलांचे वाटप त्यांनी पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे दोन महिन्यांत महापालिकेच्या तिजोरीत तब्बल १९ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे काही दिवसांतच कंत्राटदारांना थकीत बिलांचे वाटप केले जाईल, असे मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा : एमआयएमच्या खासदारांना इतकं भडकायला काय झालं : पहा Video

महापालिकेच्या कामांवर बहिष्कार
अत्यल्प वसुली, अवाढव्य खर्च यामुळे महापालिकेच्या तिजोरीत काही वर्षांपासून खडखडाट आहे. त्यामुळे कंत्राटदारांची थकबाकी तब्बल २५० कोटी रुपयांवर गेली. थकीत बिले मिळावीत या मागणीसाठी कंत्राटादारांनी वारंवार आंदोलने केली. पदाधिकाऱ्यांना साकडे घातले; मात्र बिले मिळाली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या कामांवर बहिष्कार टाकण्यात आला. त्यानंतर महापालिका मुख्यालयासमोर तब्बल ७५ दिवस साखळी उपोषण करण्यात आले. दरम्यान, आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी पदभार घेतल्यानंतर कंत्राटदारांना तुमची बिले जानेवारी महिन्यापासून दिले जातील, असे आश्‍वासन दिले. त्यानंतर कंत्राटदारांनी उपोषण मागे घेतले. मात्र अद्याप कंत्राटदारांचे पैसे देण्यात आलेले नाहीत, तर दुसरीकडे वसुलीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कधीकाळी मायनसमध्ये जाणारे महापालिकेच्या खात्यात सध्या १९ कोटी रुपये जमा असल्याचे मुख्यलेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. त्यामुळे कंत्राटदारांची बिले देण्यास आयुक्तांनी मंजुरी दिली असून, ज्या कामांच्या एबी (मेजरमेंट बुक) आहेत, अशा कामांची बिले निघू शकतात, असे पवार यांनी नमूद केले. 

हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा  - इम्तियाज जलील

ज्येष्ठता यादी तयार करणार 
कंत्राटादरांची बिले देण्यापूर्वी कामांची तपासणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. नऊ प्रभागांच्या पालक अधिकाऱ्यांमार्फत ही तपासणी केली जात आहे. सध्या दोन पालक अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. सोमवारपर्यंत आणखी काही पालक अधिकाऱ्यांकडून कामांचा तपासणी अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे, ज्या कामांच्या मोजमाप पुस्तिका सापडल्या आहेत, अशा कामांची तपासणी करून ज्येष्ठता यादी तयार करण्यात येणार आहे. मात्र ही यादी तयार करताना प्राधान्यक्रम मोजमाप पुस्तिका (एम.बी.) नुसारच ठेवण्यात येणार आहे. या यादीनुसार बिले जातील. 

go to top