एमआयएमच्या खासदारांना इतकं भडकायला काय झालं : पाहा Video

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : आमचे नेते अकबर ओवेसी एका वक्तव्याबद्दल ४० दिवस जेलमध्ये होते. पण सतत गोळ्या मारण्याची भाषा करणाऱ्या योगी आदित्यनाथ आणि अनुराग ठाकूर यांना कधी कुणी प्रश्नही का केला नाही, असा संतप्त सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. 

एमआयएमचे वारिस पठाण यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात शुक्रवारी खासदार इम्तियाज जलील यांना विचारले असता, त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशात कायदा आहे. एक व्यवस्था आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी स्पष्टीकरण दिले आहे. तरीही काही लोकांना निदर्शने करावी वाटत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. एमआयएम कोणत्याही जातीधर्माच्या विरोधात नाही. वारिस पठाण यांच्या वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन करू शकत नाही.'' 

कार्यकर्त्यांनी एखादे वक्तव्य केले, तर ते थेट पक्षाशी जोडले जाते; त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये यासाठी पक्षाध्यक्षांशी चर्चा करून मार्गदर्शक सूचना काढली जाईल, असे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले. पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांचीही आपण भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. 

महापालिका निवडणुकीसंदर्भात ते म्हणाले, की ही निवडणूक शहरासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी आपण शहराच्या विकासाचा विचार केला नाही, तर आपले शहर कधीही प्रगती करणार नाही. त्याच त्या प्रश्नांवर, त्याच भावनिक मुद्द्यांवर लढत राहिलो, तर प्रगती होणार नाही. शहराच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. 

आठ-दहा लोकच चालवतात महापालिका 

औरंगाबादची महापालिका ठराविक आठ-दहा लोकच चालवत आहेत. महापालिका आयुक्तांनी कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डांमध्ये जास्त काम झाली आहेत, त्यांची त्या कामांची एका स्वतंत्र एजन्सीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही खासदारांनी केली. 

महापालिका निवडणुकीसंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी हैदराबाद येथून एक टीम आलेली आहे. ही टीम नगरसेवकांनी केलेली कामे आणि नगरसेवकांविषयीच्या तक्रारींची चौकशी करत आहे. इच्छुक उमेदवारांबद्दलच्या जनमताचा कानोसा घेत आहे. आपण गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com