औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

प्रकाश बनकर
Sunday, 24 January 2021

पण शहरातील नागरिकांनी बॅनर लावणे हे लक्षवेधून घेते. तेही आपले रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी.

औरंगाबाद : प्रत्येक वेळेस राजकारणी मंडळी विकासकामांचे, उद्घाटन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक चौकाचौकात व गल्लोगल्ली पाहायला लावताना दिसतात. खूपच बॅनरबाजी झाल्यास शेवटी महापालिका आदेश काढून ती काढून टाकते. अपवादात्मक स्थितीत कारवाई होते. पण शहरातील नागरिकांनी बॅनर लावणे हे लक्षवेधून घेते. तेही आपले रस्ते, पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी. असा प्रकार औरंगाबादेत घडला आहे.   

OBC March: जालन्यात ओबीसींचा विराट मोर्चा; जानकर, बावनकुळेंसह महिलांचा लक्षणीय सहभाग

पाणीपुरवठा आणि खराब रस्‍त्यामुळे हैराण झालेल्या औरंगपुऱ्यातील धनमंडईवासीयांनी आपली खदखद थेट बॅनरच्या माध्यमातून मांडली आहे. जो कोणी उमेदवार गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेले पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे २० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करेल, त्यालाच पूर्ण धनमंडईतील नागरिक मतदान करतील, असा आशय या बॅनरवर आहे. 

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

या बॅनरवर लिहिले आहे की, जो कोणी उमेदवार रस्ता, पाणीप्रश्‍न सोडवेल. त्यालाच मत देण्यात येईल. अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू किंवा आमचा प्रतिनिधी उभा करू, असा इशारा बॅनरवर दिला आहे. शनिवारी पहाटे हे बॅनर लावले असून, याची शहरभर चर्चा सुरू झाली आहे. धनमंडईवासीयांच्या नावाने लावलेल्या हे बॅनर काळ्या रंगात छापले असून, येथील नागरिकांची एक प्रकार खदखद यातून दाखविण्याचा प्रयत्न झाला आहे. 

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Resident Appeal To Solve Water, Roads Problem