esakal | औरंगाबाद : चोवीस तासात चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

chandan chor 11.jpg
  • ९८ किलो चंदन केले जप्त. 
  • गुन्ह्याचा चोवीस तासात छडा.
  • दोघांना गुरुवार पर्यंत पोलिस कोठडी.  

औरंगाबाद : चोवीस तासात चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : सिडको एन-४ भागातील एका बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी २५ वर्षे जुने चंदनाचे झाड कापून नेले होते. पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या २४ तासात दोन चंदनचोरांच्या मुसक्या आवळल्या. शेख सादीक शेख कचरु (रा. नायगाव) आणि शेख जाकीर राज मोहम्मद पटेल (रा. फुलेनगर, हर्सुल) अशी चंदनचोरांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २० आँगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

सिडको, एन-४ भागातील महेश अनंत फडके यांच्या बंगल्याच्या आवारात शिरलेल्या शेख सादीक व शेख जाकीर यांनी सोमवारी (ता. दहा) रात्री दहा ते मध्यरात्री दोनच्या सुमारास चंदनाचे २५ वर्षे जुने झाड कापून चोरुन नेले होते. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. १५) गुन्हा दाखल करण्यात आला. चंदनाचे हे झाड तीघेजण छोटा हत्ती वाहनातून घेऊन जात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी १७ आँगस्ट रोजी दोघांना हर्सुल तलाव परीसर व फुले नगर याठिकाणी पकडले.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

त्यांच्याकडे चौकशी केली असता दोघांनी फडके यांच्या बंगल्यातून चंदनाचे झाड चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून वाहनासह ९८ किलो चंदन जप्त केले. दोघेही रेकॉर्डवरील चंदनचोर असून, शहर व ग्रामीण परिसरात त्यांच्याकडून अनेक चंदन चोरीचे तसेच मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार रमेश सांगळे, पोलिस नाईक बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे, दीपक जाधव, कल्याण निकम, जालिंदर मान्टे, विलास डोईफोडे यांनी केली. 

(संपादन-प्रताप अवचार)