मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी

ज्ञानेश्वर बोरूडे
Wednesday, 13 January 2021

मकर संक्रांत सण अवघ्या दोन दिवसांवर तर ग्रामपंचायत निवडणूक मतदान तीन दिवसांवर येवून ठेपली आहे

लोहगाव (औरंगाबाद): ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या मकरसंक्रांत सणाचे साहित्य वस्रालंकार, सुगडे, बोर, बिबाफुले, तीळ, गुळ, वाण साहित्य, सोने अंलकार, दागीने, खरेदीला व बांगड्या भरण्यासाठी शेतमजुरी, करणा-या सुवासिनीनी मंगळवारी (ता.12) आठवडी बाजार फुलला होता. तर बुधवारी (ता.13) घरगुती बांगड्यांची दुकाने गजबजून गेली आहेत.

मागील आठवड्यात हवामानातील बदलाने आकाशात ढगाळी वातावरणामुळे शेतीच्या कामात शेतकरी, शेतमजूर महिला कामात व्यस्त राहिल्याचे दिसले होते. मकर संक्रांत सण अवघ्या दोन दिवसांवर तर ग्रामपंचायत निवडणूक मतदान तीन दिवसांवर येवून ठेपली आहे.

BAMU: ‘पेट’च्या नोंदणीला मुदतवाढ, ३० जानेवारीला पहिला पेपर

लोहगावसह परिसरातील तोडोंळी, गाढेगावपैठण, मावसगव्हान, मुलानीवाडगाव, ढाकेफळ, अमरापूरवाघुडी, 74 जळगावातील विविध पॅनलचे महिला, पुरुष व स्वतंत्र उमेदवारांमध्ये प्रचाराची धावपळ दिसून येत आहे. प्रचार सांभाळून महिलांना कसरत करावी लागली आहे.Covishield vaccine:

अखेर औरंगाबादेत कोरोनाची लस दाखल, १६ जानेवारीपासून लसीकरणाला होणार सुरुवात

तसेच महिला मतदारांनी मात्र आठवडी बाजारात संक्राती सणात देवताना वाण वाहण्यासाठीचे सुगडे, वागी बोर, बिब्याचे फुले, भूईमूगशेंग, गाजर, तीळ तसेच सोने चांदी, साड्या, कटलरी प्लास्टिक, हळंदी कुंकू वस्तू, भेट साहित्य खरेदी व बागड्या भरण्यासाठी दिवसभर गर्दीने फुलला होता.दुसरीकडे बुधवारी सांयकाळी साडेपाच वाजता प्रचार संपणार असल्याने महिला उमेदवारांना प्रचार सांभाळून संक्रांतीचे साहित्य खरेदीसाठी कसरत करावी लागत आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad news women shopping in the market for Makar Sankranti