
या स्पर्धेचा शेवट सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे.
औरंगाबाद : मुंबईत शिवसेनेच्या वतीने अजाण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शिवसेना ही आता हिंदुत्व सोडून मोगलाईच्या वाटेवर चालत आहे, आजही आमचे हिंदुत्व कायम आहे, असं सांगत भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट सेलचे प्रदेश संयोजक ॲड. शेलैश गोजमगुंडे यांनी गुरुवारी (ता. ४) पत्रकार परिषदेत शिवगाण स्पर्धेची घोषणा केली. सध्या अजाण स्पर्धेवरून राज्यातील राजकारण तापत असल्याचे दिसत आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचा विसर-
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत आताची शिवसेना ही काँग्रेसच्या बरोबरीने काम करत आहे. शिवसेनेने आपले हिंदुत्व सोडले असून काही अल्पसंख्यांक नागरिकांना खूश करण्यासाठी असे अजाण स्पर्धेचे आयोजन आता शिवसेनेच्यावतीने होत असल्याचा आरोप शैलेश गोजमगुंडे यांनी केला. ९ फेब्रुवारीपासून शिवगान स्पर्धा सर्व महाराष्ट्रात सुरू होणार आहे.
वाचा सविस्तर: लेकीच्या पहिल्या बर्थडेसाठी आणला ड्रेस, नंतर खोलीचा दरवाजा उघडल्यावर बापाच्या...
स्पर्धेचा शेवट अजिंक्यतारा किल्ल्यावर-
या स्पर्धेचा शेवट सातारा येथील अजिंक्यतारा किल्ला येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत शिवभक्तांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी केले आहे.
"सत्तेत गेल्यापासून शिवसेनेला शिवाजी महाराजांचा विसर पडला आणि त्यांनी अजान स्पर्धा घ्यायला सुरुवात केली, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. याबद्दल आम्हाला वाईट तर वाटतंच पण अधिक वाईट याचं वाटतं की शिवसेना छत्रपती शिवरायांना विसरली आहे. आम्ही छत्रपतींना कधीच विसरणार नाही कारण महाराज महाराष्ट्राचे श्वास आहेत. भाजपाची विचारधाराच म्हणजे छत्रपती शिवराय म्हणूनच आम्ही ही 'शिवगाण' स्पर्धा सबंध महाराष्ट्रात आयोजित केली आहे" - ॲड. शैलेश गोजमगुंडे, (प्रदेश संयोजक, सांस्कृतिक प्रकोष्ठ, भाजपा महाराष्ट्र )
(edited by- pramod sarawale)