जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस; पिकांचं मोठं नुकसान

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 19 February 2021

जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे

औरंगाबाद: जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात कुठेकुठे पाऊस झाला ते पुढीलप्रमाणे-

दावरवाडी (ता.पैठण) परिसरात पहाटे 5 वाजता रिमझिम पाऊस झाला.

पाचोडसह परिसरात मध्यरात्री- पासून झाला. तसेच वादळी वाऱ्यासह अधूनमधून रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरणामूळे मोठा काळोख पसरला होता.

विहामाडवा ता.पैठण येथे पावसाला पडला.

डोळ्यासमोर एकुलत्या एक मुलाने सोडले प्राण, वडिलांनी फोडला हंबरडा

बाबरा (ता. फुलंब्री) येथे काल रिमझिम पाऊसाला सुरुवात झाली होती. यामध्ये गहू, हरबरा पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

अंतरवाली खांडी, देवगाव (ता.पैठण) येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्यास सुरुवात, इतर ठिकाणी ढगाळ वातावरण

लोहगाव व परीसरात वा-यासह रिमझिम पाऊस

पिशोर व परिसरात विजेच्या कडकडाटासह रिमझिम पावसाला सुरवात.

उमरग्यात कोरोनाचे पाच पॉझिटिव्ह रुग्ण, आता मास्कचा वापर अनिवार्य

देवगाव रंगारी परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास पाऊस

औराळा, चापानेर, जेहुर परिसरात बेमोसमी पावसाची जोरदार हजेरी. गहू हरभरा कांदे पिकाचे मोठे नुकसान.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Rain in many places in the district Large crop damage