औरंगाबादेत आणखी तीन वृद्धांचा मृत्यू; बळींची संख्या २०६ वर

मनोज साखरे
Tuesday, 23 June 2020

औरंगाबाद शहरातील पीर बाजार येथील एक आणि वैजापूर व फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची आतापर्यंतची संख्या २०६ वर गेली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील पीर बाजार येथील एक आणि वैजापूर व फुलंब्री तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना बळींची आतापर्यंतची संख्या २०६ वर गेली आहे.

 

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

कोरोना बाधित वैजापूर तालुक्यातील वंजारगाव येथील ६६ वर्षीय वृद्धाचा सोमवारी दुपारी साडेतीन वाजता, पिर बाजार येथील ८६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा दुपारी साडेचार तर ६० वर्षीय फुलंब्री तालुक्यातील व्यक्तीचा रात्री साडे आठ वाजता घाटी रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोनामुळे तीव्र श्वसन विकार व न्यूमोनिया मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.

 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
आज १०८ पुरुष, ५५ महिलांना कोरोनाची लागण 
औरंगाबादेत दिवसेंदिवस कोरोनाबधितांची संख्या अतिषय झपाट्याने वाढत आहे. आज (ता.२३) सकाळी १६३  कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. आज वाढलेल्या १६३ रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २०४६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये ५५ महिला आणि १०८ पुरुषांचा समावेश आहे.

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

ग्रामीण भागातील रुग्ण 
मांडकी (२), सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर (२), राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (५), ओयासिस चौक, पंढरपूर (१), ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर (१), हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), सारा गौरव, बजाज नगर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (१), एन अकरा, मयूर नगर, हडको (२), पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर (१), संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर (१), वडगाव (१), विराज हाईट, बजाज नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), करमाड (६), फत्तेह मैदान, फुलंब्री (१), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री (१), कोलघर (२), गजगाव, गंगापूर (१), लासूर नाका,गंगापूर (१), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर (१), शिवूर बंगला (२), कविटखेडा, वैजापूर (१), शिवूर (५), मधला पाडा, शिवूर, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये ५५ स्त्री व १०८ पुरुष आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad three old person corona death