esakal | कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

श्री. खरात म्हणाले, ‘‘कोरोनाला हरविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे

कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण देशातील यंत्रणा कामाला लागलेली आहे; पण या लढाईत प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे हाच सर्वोत्तम इलाज आहे. कर्तव्य निभावताना प्रत्येकाने जबाबदारीचे भाव ठेवणेही आवश्यक आहे, असे जाधववाडी येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी अनिल खरात म्हणाले. 

हेही वाचा : थेट कोरोना बाधितांच्या वाॅर्डातुन, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

श्री. खरात म्हणाले, ‘‘कोरोनाला हरविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या काळात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, यासाठी शहराच्या विविध भागांत पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक

मात्र, नोकरी करून घरी परतताना, घरच्यांमध्ये मिसळताना, लेकरांना जवळ येऊ देताना निश्चितच भीती वाटते; पण कर्तव्यावर असताना दर दोन तासाला हाताला सॅनिटायझर लावून, नाका-तोंडावर मास्क लावणे, हात धुणे अशी काळजी घेत असतो. ड्युटी संपवून घरी गेल्यानंतर सरळ गच्चीवर जाऊन कपडे बदलतो व अंघोळ करूनच घरात प्रवेश करतो. असा दिनक्रम करून घेतला आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

आरोग्य विभागाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. तसे केले तर कोरोनाला हरवणे आपल्याला सोपे होणार आहे. भीती असली तरी काळजी घेणे हा सध्यातरी सर्वोत्तम उपाय मानला जात आहे. त्यामुळे प्रत्येकानेच शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपले कर्तव्य पार पाडावे.