त्या दिवशी जोरदार हवा सुरु होती अन् मशीद आपोआप पडली 

शेखलाल शेख
Wednesday, 30 September 2020

खासदार इम्तियाज जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमात ए इस्लामी हिंदच्या कृषी विधेकायकाच्या विरोधातील आंदोलनात पोहचले होते. त्यावेळी त्यांनी संबोधित करतांना बाबरी मशिदीत विध्वंसावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपले मत व्यक्त केले.

औरंगाबाद: आमचा जेवढा विश्‍वास होता, अपेक्षा होती त्यानुसारच न्यायालयाचा निकाल आला. यामध्ये आम्हाला कोणतेही आश्‍चर्य झाले नाही. फक्त न्यायालयाने एवढे म्हणने शिल्लक ठेवली की मशिद कुणी पाडली नाही तर त्या दिवशी जोरदार हवा चालु होती आणि मशीद आपोआप पडली. अशी प्रतिक्रीया खासदार इम्तियाज जलील यांनी बाबरी मशिदीत प्रकरणावर विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेल्या निकालावर व्यक्त केली. 

खासदार इम्तियाज जलील हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमात ए इस्लामी हिंदच्या कृषी विधेकायकाच्या विरोधातील आंदोलनात पोहचले होते. त्यावेळी त्यांनी संबोधित करतांना बाबरी मशिदीत विध्वंसावर न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपले मत व्यक्त केले.

विमा कंपनी क्लेम का फेटाळते 

खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयावर आम्हाला आर्श्‍चय झालेले नाही. आम्हाला जी अपेक्षा, विश्‍वास होता त्यानुसार हा निकाल आला आहे. अशा प्रकारचे निर्णय येण्यास सुरवात झाली तर न्यायप्रक्रीयेवरचा विश्‍वास उडुन जाईल. आता आपण विचार करावा हा देश कुठे जात आहे. या प्रकरणात जे ३२ लोक आरोपी होते आता ते या निर्णयाचे स्वागत करत आहे. आम्ही सुद्धा या निर्णयाचे स्वागत करतो. कारण निर्णय काहीसा असाच येणार होता.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Babri Demolition Case Imtiaz Jaleel Aurangabad News