स्वतः कंपनी काम करुन दिव्यांगांचे संसार उभे करणारे देवदूत आहेत तरी कोण?

सुषेन जाधव
गुरुवार, 16 जानेवारी 2020

औरंगाबाद : केवळ सहानुभूती दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देत औरंगाबादेतील बजाज ऑटो कंपनीतील रिक्षा विभागातील साधारण पाचशे कर्मचाऱ्यांनी वर्षभरातील सर्वांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून लाखभर रुपये जमा केले आणि यातून दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. रिक्षा फायनल असेंब्ली, बजाज ऑटो असे त्या कर्मचाऱ्यांच्या समूहाचे नाव आहे.

हेही वाचा- "त्या' लेखकावर गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चा 

औरंगाबाद : केवळ सहानुभूती दाखविण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून उत्तर देत औरंगाबादेतील बजाज ऑटो कंपनीतील रिक्षा विभागातील साधारण पाचशे कर्मचाऱ्यांनी वर्षभरातील सर्वांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून लाखभर रुपये जमा केले आणि यातून दिव्यांगांचे संसार उभे केले आहेत. रिक्षा फायनल असेंब्ली, बजाज ऑटो असे त्या कर्मचाऱ्यांच्या समूहाचे नाव आहे.

हेही वाचा- "त्या' लेखकावर गुन्हे दाखल करा - मराठा क्रांती मोर्चा 

कर्मचाऱ्यांच्या या समूहातर्फे जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 20 दिव्यांग महिला व पुरुषांना त्यांच्या व्यवसायाशी निगडित शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, पंक्‍चर काढण्याचे अद्ययावत कीट, कुक्कुटपालनासाठी खुराडे इत्यादी अनेक उपयोगी वस्तू घेऊन देण्यात आल्या. यातून दिव्यांग व्यक्तींचा संसार चांगल्या प्रकारे उभा राहणार असल्याचे समूहाचे दत्ता वाकडे यांनी सांगितले. 

क्लिक करा- वाहनांच्या फास्टॅगला लागलाय ब्रेक 

हा वस्तू वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी बजाज ऑटो कंपनीच्या थ्री व्हीलर विभागाचे डिपार्टमेंट हेड मनोज केळकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. व्यासपीठावर शिवाजी गाडे (जिल्हाध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटना), बालाजी शिंदे, श्री. साकला, गोपाळ कदम (एमडी- सूरज टूल्स लि.), पुंडलिक हागे (मॅनेजर- कॉटन ग्रीव्हज कंपनी) तसेच सत्यविजय देशमुख, केशव पंडित व विजय पवार (बजाज ऑटो एम्प्लॉईज युनियनचे प्रतिनिधी) यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे वाचलंत का?-...आणि असे झाले तुरुंगात हळदीकुंकू

प्रास्ताविक दत्ता वाकडे यांनी केले. कार्यक्रमासाठी गुणवंत हंगरगेकर, सुहास दाणी, विजय पोतदार, वसंत जाधव, नागेश आष्टुरे, दिलीप चिमणे, दिलीप मांडगे, दुर्गादास देशपांडे, प्रकाश कानडजे, पंढरीनाथ बोकील, विश्‍वंभर वाईकर, ज्ञानेश्‍वर भागवत साहेब, जवकर विक्रम, नानाभाऊ गवळी, रणजित साळी, चंद्रमणी कांबळे, तुळशीराम जाधव, बापासाहेब लगड, दिलीप झिने, वंती जाधव, चांदणी सोनवणे, रमेश तिवारी, श्रीराम कुलकर्णी, विष्णू कादगे, आबासाहेब आहेर, श्रीवास्तव, डिक्कर बिभीषण शेळके, मालकर, मोहम्मद शफी यांनी पुढाकार घेतला. 

आजवर वाढदिवसानिमित्त 500 ते 700 रुपयांचे चॉकलेट वाटले जायचे. आता समाजातील वृद्धाश्रम, अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या अनाथाश्रमांना, एड्‌सग्रस्त मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्था, अंध मुलींचे संगोपन व शिक्षण पूर्ण करणाऱ्या संस्था व गोशाळा यांना दहा वर्षांपासून मदत करतो आहोत. या उपक्रमाने दिव्यांगाचा संसार उभा राहिल्याचे समाधान आहे. 
-दत्ता वाकडे, बजाज कंपनी, रिक्षा विभाग. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bajaj Auto Company Workers Help Divyang Family