esakal | दहा लाख भाविक दर्शनाला मुकले; भद्रा मारुतीच कोरोनाचे संकट दूर करील
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

आज हनुमान जयंती. खुलताबादच्या प्रसिद्ध भद्रा मारुतीच्या दर्शनाला आज देशभरातून सुमारे दहा लाख भाविक दरवर्षी येतात. पण यंदा कोरोनामुळे हे मंदिर भाविकांसाठी बंद होते. पण भद्रा मारुती लवकरच आपल्या देशावरचे कोरोनाचे संकट दूर करतील, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

दहा लाख भाविक दर्शनाला मुकले; भद्रा मारुतीच कोरोनाचे संकट दूर करील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आज हनुमान जयंती. खुलताबादच्या प्रसिद्ध भद्रा मारुतीच्या दर्शनाला आज देशभरातून सुमारे दहा लाख भाविक दरवर्षी येतात. पण यंदा कोरोनामुळे हे मंदिर भाविकांसाठी बंद होते. पण भद्रा मारुती लवकरच आपल्या देशावरचे कोरोनाचे संकट दूर करतील, असा विश्वास शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला.

जगप्रसिद्ध वेरुळ लेणी पाहायला आलेले पर्यटक खुलताबादच्या भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत. तसेच या निद्रिस्त अवस्थेतील मारुतीच्या दर्शनाला देशभरातून भाविक वर्षभर येत असतात. दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा होतो. दहा लाखांहून अधिक भाविक हनुमान जयंतीच्या दिवशी भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी खुलताबादमध्ये दाखल होत असतात. यातील अनेक भक्त हे पायी चालत येतात.

खैरे म्हणतात, मी मरेपर्यंत....

यंदाच्या हनुमान जयंतीला कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या नियमानुसार फक्त चारच जणांनी मारुतीची आरती करत हनुमान जयंती साधेपणाने साजरी केली. याबद्दल बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, की यावेळी मोठ्या जड अंतःकरणाने आम्ही मारुतीरायाची आरती केली. जसे लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमंताने संजीवनी औषधी आणली आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवले, तसेच भद्रा मारुती जगावर आणि देशावर आलेले हे कोरोनाचे संकट देखील दूर करतील, असा आम्हाला विश्वास आहे.

संस्थानतर्फे दहा लाखांची मदत

धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या आवाहनानुसार भद्रा मारूती संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीत पाच लाख व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पाच लाख, असा एकूण दहा लाख रुपयांचा निधी दिल्याची माहितीही चंद्रकांत खैरे यांनी दिली.