esakal | मला अनेक पक्षांकडून ऑफर, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

मातोश्री हे आपलं दैवत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण काम केलं आहे. आताही पक्षाचंच काम करत राहू. मातोश्रीवरून केव्हाही बोलावणं आलं तरी आम्ही जाऊ, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

मला अनेक पक्षांकडून ऑफर, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : ''मला अनेक पक्षांकडून ऑफर होत्या, मात्र मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार,'' अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेने राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे खैरे नाराज झाले आहेत. 

''पक्षाला प्रियंका चतुर्वेदी यांचं काम दिसलं, पण आमचं काम दिसलं नाही. त्या हिंदी, इंग्रजीही बोलतात. आता आदित्य ठाकरे यांना त्यांचे काम आवडले असेल, तर काय करणार,'' अशी प्रतिक्रिया खैरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आपण मात्र स्मशानात जाईपर्यंत शिवसेनेतच राहू, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

तनवाणींनी काय दिलं भाजपला

मातोश्री हे आपलं दैवत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण काम केलं आहे. आताही पक्षाचंच काम करत राहू. मातोश्रीवरून केव्हाही बोलावणं आलं तरी आम्ही जाऊ, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

''राज्यसभेसाठी मला उमेदवारी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांना मी बोललो होतो. संजय राऊत, अनिल देसाईही बोलले होते. पण आता आदित्य ठाकरे यांचे नवे राजकारण आहे. त्यामुळेच चतुर्वेदी यांच्या नावाचा विचार झाला असावा," असे ते म्हणाले. 

go to top