मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांची कार फोडली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

समतानगर येथे भागवत कराड यांचे घर आहे. आज रात्री आठ ते दहा जण दुचाकीवर आले त्यांनी पार्कींगमध्ये उभी असलेल्या कारच्या पाठीमागील काचा फोडल्या. त्यानंतर घरावर सुद्धा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विकास महामंडळचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड यांच्या समतानगर येथील घराच्या पार्कींगमध्ये उभी कार अज्ञातांनी फोडली. शिवाय घरावर दगडफेक केल्याचे कराड यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. समतानगर येथे भागवत कराड यांचे घर आहे. आज रात्री आठ ते दहा जण दुचाकीवर आले त्यांनी पार्कींगमध्ये उभी असलेल्या कारच्या पाठीमागील काचा फोडल्या. त्यानंतर घरावर सुद्धा दगडफेक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु केली होती. भाजप मधील काही जणांनी शिवसेनेत प्रवेश केला असून यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहे. या राजकीय वादातून या हल्ला करण्यात आल्याचा आरोप भागवत कराड यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र हल्ला कुणी व का केला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सध्या क्रांती चाैक पाेलिस ठाण्यात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमले असून त्यांनी दाेषींवर कारवाई करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhagwat karad BJP shiv sena Aurangabad news