Bharat Bandh Updates : औरंगाबादेत डाव्या संघटनांकडून रास्ता रोको, कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

मधुकर कांबळे
Tuesday, 8 December 2020

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने औरंगाबाद येथील दिल्ली गेट येथे सकाळी साडेअकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

औरंगाबाद : दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंगळवारी (ता.आठ) भारत बंद पुकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने औरंगाबाद येथील दिल्ली गेट येथे सकाळी साडेअकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी दिल्लीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आला होता.

आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या रास्ता रोकोमध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, केंद्रीय कामगार संघटना कृती समिती आणि जनआंदोलन संघर्ष समिती यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी अभय टाकसाळ, भगवान भोजने, राम बाहेती, मधुकर खिल्लारे, ॲड. विष्णू ढोबळे, सुभाष लोमटे, ॲड.इकबालसिंग गिल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Bandh Updates Left Organizations Do Rasta Roko Aurangabd News