
निवडणुकांच्या सुरुवातीला भास्कर पेरे पाटलांनी माघार घेतली होती
औरंगाबाद: पाटोदा या आदर्श ग्रामपंचायतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. त्याचप्रमाणे तिथं धक्कादायक निकालही लागला आहे. मागील 25 वर्षांपासून पाटोदा ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता असणारे माजी सरपंच तसेच पाटोदाच्या विकासाचे शिल्पकार असणारे भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव झाला आहे.
निवडणुकांच्या सुरुवातीला भास्कर पेरे पाटलांनी माघार घेतली होती, निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. त्याजागी तरुणांना संधी म्हणून मुलगी अनुराधा पेरे पाटील निवडणुकीत उभारली होती. पण तीन जागांसाठीचा निकाल हाती आला असता त्यात अनुराधा पाटील यांचा पराभव झाला आहे.
भाजपा लढणार औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्व जागा
11 सदस्य असणाऱ्या पाटोदा ग्रामपंचायलीतीमध्ये 8 सदस्य आधीच बिनविरोध निवडूण आले होते. राहिलेल्या 3 जागांवर निवडणूक झाली होती. त्यातील एका जागेवर भास्कर पेरे पाटलांची कन्या अनुराधा पाटील उभ्या राहिल्या होत्या, पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.
(edited by- pramod sarawale)