भाजपवाल्यांना गोंधळ कुठे घालावे याची कल्पना नाही, मंदिर आंदोलनावरुन प्रकाश आंबेडकरांची टीका

ई सकाळ टीम
Wednesday, 11 November 2020

भाजपवाल्यांना गोंधळ कुठे घालावे याची कल्पना नाही. कट्टर धार्मिकता मानणारा भाजपला तुळजाभवानीसमोर गोंधळ कुठे घालाव याची सुद्धा कल्पना नाही. लोकांनीच बडवून त्यांना हाकलून लावले, अशी टीका मंदिर आंदोलनावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केली.

औरंगाबाद : भाजपवाल्यांना गोंधळ कुठे घालावे याची कल्पना नाही. कट्टर धार्मिकता मानणारा भाजपला तुळजाभवानीसमोर गोंधळ कुठे घालाव याची सुद्धा कल्पना नाही. लोकांनीच बडवून त्यांना हाकलून लावले, अशी टीका मंदिर आंदोलनावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी केली. औरंगाबाद येथे बुधवारी (ता.११) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुम्ही प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढविता आणि हरता याविषयी प्रकाश आंबेडकरांना विचारला असता माझ्याकडे पैसे नाहीना. मला मानणारा वर्ग गरीब आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींच्या विरोधात देश पातळीवर मजबूत आघाडीची गरज

त्याला मतदानाचा दिवस दिवाळीचा वाटतो. आम्ही त्याला दिवाळी देऊ शकलो तर आमच्याकडे यश आले अस समजून घ्या. आम्ही बघतो  टाटा, बिर्ला असे कोणी आमच्या पाठीमागे राहतात काय ? सक्षम मतदारांनी मदत केली. त्यामुळे बिहारमध्ये हेलिकॉप्टरने फिरता आले. ॲड आंबेडकर म्हणाले, की भारत-चीन युध्द चालू असेल तरी निवडणुका घेतल्या पाहिजे. त्या पुढे ढकलता येत नाही. दुर्दैवाने मी वकिलीची प्रॅक्टिसिंग करत नाही. नाहीतर या सरकारला अडचणीत आणले असते.

मराठा समाजाचे १७ टक्के आरक्षण बाजूला काढा. उरलेल्या जागा तुम्ही भराना. शेवटी प्रशासन चालवायचे आहे. शासन चालविण्यासाठी प्रशासन गरजेचे आहे, असे नोकरी भरतीविषयी त्यांनी मत व्यक्त केले. आगामी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी जुन्या मित्राबरोबर निवडणूक लढविणार का असे विचारले असता नाही असे सांगत एमआयएमबरोबर आघाडीची शक्यता त्यांनी नाकारली आहे. पुढे ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले, की  काँग्रेस पक्षाबरोबर लोक जायला तयार नाहीत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Was Not Aware Where To Agitate, Prakash Ambedkar Attack On Party