esakal | भाजपचे राजकारण नेहमीच दिशाभूल करणारे, प्रकाश आंबेडकर यांची टीका
sakal

बोलून बातमी शोधा

0ambedkar_10

भाजपचे राजकारण नेहमीच दिशाभूल करणारे आहे. मात्र आता जनतेने त्यांचे राजकारण ओळखले आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

भाजपचे राजकारण नेहमीच दिशाभूल करणारे, प्रकाश आंबेडकर यांची टीका

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : भाजपचे राजकारण नेहमीच दिशाभूल करणारे आहे. मात्र आता जनतेने त्यांचे राजकारण ओळखले आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. बीड येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाताना शनिवारी (ता. २४) काही काळ ते शहरात थांबले होते.

त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपा नेहमी जनतेला प्रलोभन देत आली आहे. भाजपच्या आरोग्य मंत्र्याने म्हटले आहे, की लस २०२१ पूर्वी येणार नाही. भाजपाचे राजकारण हे नेहमी जनतेची दिशाभूल करणारे आहे. आता जनतेने भाजपचे राजकारण ओळखले आहे.

आरक्षणारील स्थगिती न उठल्यास राज्यभरात उद्रेक : मराठा क्रांती मोर्चाचा औरंगाबादेत इशारा

औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकी विषयी ते म्हणाले, निवडणूक जाहीर झाल्या नंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार आहे. राज्य सरकारच्या स्थैर्याबाबत विचारले असता "मी कधी भविष्यवाणी करत नाही" असे उत्तर त्यांनी दिले. मात्र राज्य सरकारच्या कारभारावर मी समाधानी नाही असे त्यांनी स्पष्ट केले. माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरा विषयी बोलताना मी कोणा एका व्यक्ती बाबत बोलणार नाही, प्रत्येकाला आपले राजकारण करण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर

go to top