esakal | पंकजा म्हणतात, 'संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडेंनीही राजीनामा दिला पाहिजे'

बोलून बातमी शोधा

pankaja munde}

मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या पुजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला आहे

पंकजा म्हणतात, 'संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडेंनीही राजीनामा दिला पाहिजे'
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: राज्यात मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. पुजाने आत्महत्या केल्यानंतर मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर राज्यात विरोधी पक्ष भाजपाने हा मुद्दा उचलून धरल्याने अखेर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. 

यापुर्वी काही आठवड्यांपुर्वी रेणू शर्माने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण ते प्रकरण मुंडेंच्या फेसबूक पोस्टनंतर काही प्रमाणात निवळलं होतं. सोशल मीडियावरही धनंजय मुंडेना काही प्रमाणात समर्थन मिळाले होते. आता संजय राठोंडांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

"संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदी आमदार तानाजी सावंतांना संधी...

'धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'-

आता पंकजा मुंडेंनी बंधू धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पंकजा म्हणाल्या की, धनंजय मुंडेंनीही स्वतःहून निर्णय घ्यावा आणि राजीनामा द्यावा. कुठल्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करता येणार नाही. सर्वांनी जात धर्माच्या पलिकडे विचार करायला पाहिजे, असंही पंकजा म्हणाल्या.

सत्य बाहेर येईल-

संजय राठोड यांनी अगोदरच राजीनामा द्यायला पाहिजे होता. चौकशीनंतर सगळं सत्य बाहेर येईल. राठोड जर निर्दोष असतील तर ते चौकशीनंतर समजेल.