
या छायाचित्रातील बिंदूकडे ३० सेकंद टक लावून पाहिले आणि त्यानंतर डोळे बंद करून भिंतीकडे तोंड करून डोळे २-३ वेळा उघडझाप करून पाहिले तर हे ब्लॅक अॅण्ड व्हॉइट छायाचित्र भिंतीवर रंगीत झालेले दिसते.
औरंगाबाद : सध्या सोशल मीडियावर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. ब्लॅक अॅण्ड व्हॉइट असलेल्या या छायाचित्रातील बिंदूकडे ३० सेकंद टक लावून पाहिले आणि त्यानंतर डोळे बंद करून भिंतीकडे तोंड करून डोळे २-३ वेळा उघडझाप करून पाहिले तर हे ब्लॅक अॅण्ड व्हॉइट छायाचित्र भिंतीवर रंगीत झालेले दिसते. अनेकांनी हा अनुभव घेतला. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, असे का होते, या बाबत eSakal.com ने जाणून घेतलेली खास माहिती...
या बाबत आम्ही इंटरनेटवर शोध घेतला. त्यात असे अनेक छायाचित्र आढळले. शिवाय या बाबत डॉ. अमित सिंघल यांनी दिलेली माहितीही एका वेबसाइटवर होती. डॉ. सिंघल म्हणतात, ‘जेव्हा-केव्हा आपण एक गडद आणि एक हलका असा क्रॉन्ट्रास्टिंग रंग पाहतो तेव्हा गडद रंगाचा जो भाग आहे. त्यामुळे फोटोरिसेप्टरची केमिकल रिअॅक्शन करणारे केमिकल संपत जाते. परिणामी, आपल्याला सर्व काही हलक्या बॅकग्राउंडमध्ये दिसते. व्हॉट्सअॅपवर सध्या जे छायाचित्र व्हायरल होत आहे, त्यातील एक भाग गडद आहे आणि दुसरा फिक्का म्हणजेच हलका आहे. गडद रंगाला काही वेळ टक लावून पाहिल्यानंतर तो हलका होतो.
त्यानंतर आपण इतर हलक्या रंगाच्या जागेकडे फोकस करतो तर त्या ठिकाणी हलका रंग गडद दिसतो आणि गडद रंग हलका दिसतो. त्यातून पूर्वीची ब्लॅक अॅण्ड व्हाइट प्रतिमा रंगीत दिसते. एकूणच काय तर कॅमेऱ्यातील रिलमधील फोटो डेव्हलप केल्यानंतर फोटो जसा दिसतो तसाच तो या ठिकाणी दिसतो. या प्रक्रियेत डोळे आणि मेंदू दोघेही सक्रिय होतात.’
संबंधित बातमी - वाढला स्क्रिनचा वेळ, बिघडतोय डोळ्यांचा मेळ
हे छायाचित्र आम्ही औरंगाबाद येथील नेत्रतज्ज्ञ काही नेत्रतज्ज्ञांना व्हॉट्सअॅप केले. त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ‘‘हा प्रकार सामान्य आहे. यात वेगळे असे काही नाही,’’ अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.