वाढला स्क्रिनचा वेळ, बिघडतोय डोळ्यांचा मेळ

मधुकर कांबळे
Wednesday, 13 May 2020

वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आल्याने नोकरदार मंडळी लॅपटॉप, कंप्युटरवरून घरी कामे करत आहेत. तर घरातील अन्य सदस्य मनोरंजन म्हणून आपला जास्तीत जास्त वेळ टी. व्ही. पाहण्यात, मोबाईलवर खेळण्यात, फिल्म पाहत आहेत. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. 

औरंगाबाद ः लॉकडाऊनमध्ये करायचे तरी काय? खाणे-पिणे, आराम अन् झोपा घेऊनही कंटाळा यायला लागला. मग हाती असलेला मोबाईल असो की टी. व्ही.चा पडदा, सतत या स्क्रिनवर डोळे खिळलेले दृश्‍य घराघरात पहायला मिळत आहे. त्यात वर्क फ्रॉम होमच्या संकल्पनेमुळे नोकरदारवर्ग घरी लॅपटॉपवरून काम करत आहे. याचा परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होत आहे.

यामुळे लॉकडाऊमच्या काळात डोळे सांभाळणे गरजेचे बनले आहे. लॉकडाऊनच्या सुरूवातीला घरात कुटूंबासोबत रहाण्यासाठी वेळ मिळाला असे वाटले मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला तसा घरात बसण्याचा कंटाळा येऊ लागला. वर्क फ्रॉम होम ही संकल्पना पुढे आल्याने नोकरदार मंडळी लॅपटॉप, कंप्युटरवरून घरी कामे करत आहेत. तर घरातील अन्य सदस्य मनोरंजन म्हणून आपला जास्तीत जास्त वेळ टी. व्ही. पाहण्यात, मोबाईलवर खेळण्यात, फिल्म पाहत आहेत. त्यात उन्हाचा तडाखा सुरू आहे. 

काय होतो त्रास? 
नेत्रशल्यचिकित्सक डॉ. शुभा झंवर म्हणाल्या, की सतत स्क्रिनपुढे राहिल्याने डोळा दुखणे, डोळे लाल होणे, पाणी येणे अशा समस्या निर्माण होत आहेत. लहाण मुलांमध्ये तिरळेपणा येऊ शकतो. तर मोठ्यांमध्ये डोळे कोरडे होण्याचा त्रास होऊ शकतो. मग यामुळे डोके दुखणे, डोळे दुखणे असा त्रास सुरू होतो. सतत मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रिनपुढे राहिल्याने युव्ही लाईटमुळे नेत्रपटलास इजा होऊन नजर कमी होण्याचा धोका असतो. उन्हामुळे वातावरणात उष्मा वाढलेला आहे यामुळे डोळ्यातील अश्रूंची लवकर वाफ होऊन डोळे कोरडे पडण्याची शक्यता आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठीक्लिक करा

काय करावे 
मोबाईलच्या स्क्रिनसमोर किती वेळ बसायचे याच्या वेळा ठरवा 
रूल ट्वेन्टीचे पालन करा. म्हणजेच 20 मिनीटे स्क्रिनसमोर बसल्यानंतर 20 फूट 
लांबवर दोन सेकंद पहावे. थोडावेळ डोळे बंद करावेत आणि मग पुन्हा काम करावे 
टी. व्ही.च्या स्क्रिनपासून किमान सात ते आठ फूट अंतरावर बसून पहावे. 
मधूनमधून डोळ्यांची उघडझाप करावी. ज्यांना टीव्हीजवळ जाऊन पहावे लागते 
त्यांनी ते डोळे तपासून घेण्याचे लक्षण समजून नेत्ररोगतज्ञाकडे तपासणी करावी.

पौराणिक मालिका सुरू असल्याने लहान मुले बाण तयार करून खेळतात. 
यातून कुटुंबीयांच्या डोळ्याला इजा होऊ शकते. यासाठी असे खेळ मुलांना खेळू देऊ नये. 

कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी वारंवार डोळ्यांना हात लाऊ नये, डोळे चोळू नयेत. बाहेर जाताना चष्मा असेल तर तो वापरावा, नसेल तर गॉगल किंवा फेसशिल्ड वापरावे. लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांकडे जाणे शक्य नसेल तर टेली कन्सल्टिंग करावी म्हणजे डोळ्यांना काही त्रास होत असेल तर डोळ्याचा फोटो काढून नेत्ररोगतज्ञाकडे व्हॉटसअपवर टाका म्हणजे ते तो पाहून औषधी व सल्ला देऊ शकतील. 
डॉ. शुभा झंवर, नेत्रशल्यचिकित्सक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How to take care eyes