esakal | काय दिले तनवाणींनी भाजपला आव्हान वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

तीन वर्षे भाजपचा शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष वाढवला. महापालिकेत १३ असलेल्या भाजप नगरसेवकांची संख्या २३ कशी झाली? याचे उत्तरही माझ्यावर टीका करणाऱ्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान श्री. तनवाणी यांनी दिले. 

काय दिले तनवाणींनी भाजपला आव्हान वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद- ‘भाजपने सगळे काही दिल्यावरही तनवाणींनी पक्ष सोडला, ते तर सत्तेचे भिक्षुक,’ अशी टीका भाजपमधील काही नेत्यांनी केली. त्यावर किशनचंद तनवाणी यांनी पाच वर्षांत भाजपने सत्तेच मला कोणते पद दिले? असा सवाल करीत पलटवार केला. तीन वर्षे भाजपचा शहराध्यक्ष म्हणून काम करताना पक्ष वाढवला. महापालिकेत १३ असलेल्या भाजप नगरसेवकांची संख्या २३ कशी झाली? याचे उत्तरही माझ्यावर टीका करणाऱ्या नेत्यांनी द्यावे, असे आव्हान श्री. तनवाणी यांनी दिले. 

भाजपचे माजी शहाराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १९) शिवबंधन बांधून घेत घरवापसी केली. त्यानंतर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सत्तेसाठी पक्ष सोडणारे भिक्षुक अशा शब्दांत तनवाणी यांच्यावर टीका केली, तर भाजपने सगळे काही दिल्यावरही तनवाणी यांनी पक्ष सोडला, यावरून त्यांची पात्रता लक्षात येते अशी टीका आमदार अतुल सावे यांनी केली होती. या टीका आणि आरोपांना तनवाणी यांनी गुरुवारी (ता. २०) शहरात दाखल होताच प्रत्युत्तर दिले.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

तनवाणी म्हणाले, ‘‘सत्तेसाठी मी शिवसेनेत गेलो असा आरोप करणाऱ्या बागडे यांनी गेली पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना कोणते सत्तेचे पद दिले. भाजपमधील पक्षांतर्गत संघटनेत झालेल्या बदलांनी ते तरी समाधानी आहेत का? कुणी पक्ष सोडल्याने त्या पक्षाला काही फरक पडत नसतो, या सावे यांच्या मताशी मी सहमत आहे; पण शिवसेनेतून मी जेव्हा भाजपमध्ये आलो, शहराध्यक्ष झालो त्यानंतर शहरात पक्षाची झालेली भरभराट ते नाकारतील का? २०१५ च्या आधी महापालिकेत भाजप नगरसेवकांची संख्या किती होती, मी आल्यानंतर ती २३ पर्यंत वाढली हे ते नाकारतील का? असा सवालही तनवाणी यांनी केला. 

देईल ती जबाबदारी मान्य 
शिवसेनेत प्रवेश करताना कुठल्या जबाबदारीचे आश्वासन तुम्हाला दिले गेले? या प्रश्‍नावर तनवाणी म्हणाले, ‘‘महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एखादी जबाबदारी दिली जाईल असे वाटते. माझा कुठलाही आग्रह किंवा मागणी पक्षाकडे नाही. जी जबाबदारी पक्ष माझ्यावर टाकेल ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडील एवढे मात्र निश्चित. शिवसेनेने मला खूप काही दिले आहे, शहरप्रमुख, नगरसेवक, सभागृहनेता, महापौर, म्हाडाचे अध्यक्षपद, विधानपरिषदेत आमदार अशी अनेक पदे दिली. त्यामुळे आता पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल,’’ असेही तनवाणी यांनी स्पष्ट केले.

शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके वाचा