esakal | भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Save

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस परवानगी न घेता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात आंदोलन केल्याप्रकरणी पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार अतुल सावे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, परवानगी न घेता आंदोलन केल्याने कारवाई

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद  : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस परवानगी न घेता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात आंदोलन केल्याप्रकरणी पक्षाचे आमदार अतुल सावे यांच्यासह १२ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार कचरु निकम यांनी फिर्याद दिली.

सास्तूर बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, वंचितच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ठाकूर यांची मागणी

फिर्यादीनुसार भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर, पूर्वचे आमदार अतुल सावे, समीर राजूरकर, अनिल मकरिये, कुणाल मराठे, मनोज पांगरकर, राजगौरव वानखेडे, राजेश मेहता, बंटी राजू चावरिया, महेश राऊत, विजय लोखंडे, प्रमोद राठोड यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यासह ८० ते ९० कार्यकर्त्यांनी फिजिक डिस्टन्सिंग न पाळत, मनाई आदेश लागू असतानाही बुधवारी (ता.चार) सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान पोलिस विभागाची कोणतीही परवानगी न घेता निषेध आंदोलन केले होते. या प्रकरणी शहरातील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर