esakal | चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

बुधवारी (ता.सहा) तीन क्रूझर गाड्यातून त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने तशी परवानगी दिली आहे. यासाठी डोणगावकर व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी गाड्यांचे सर्व नियोजन केले आहे. 

चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ 

sakal_logo
By
राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : ठाणे व नाशिक येथून यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळील बोरी (साई) येथे जाणाऱ्या चिमुकल्यांचे ते भुकेले चेहरे, त्यांनी केलेली मदतीची याचना अस्वस्थ करतेय... हे शब्द आहेत, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर यांचे. वैजापूर येथे या बाया-बापड्यांसमवेत मोठ्या संख्येने असलेल्या चिमुकल्यांची खाण्या-पिण्याची सोय तर केलीच. शिवाय, डोणगावकर यांच्या पुढाकाराने वैद्यकीय तपासणी करुन त्यांना बुधवारी (ता.६) गावी नेवुन सोडण्याचीही तयारी झाली आहे. 

हेही वाचा : कर्तव्य निभावताना हवे जबाबदारीचे भान   

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढच असल्याने राज्याच्या विविध काणाकोपऱ्यातून कामगार मंडळी आपापल्या गावी परतत आहेत. वाहतूक बंद करण्यात आल्याने दहा दिवसांपासून अनेकजणांनी लेकरांबाळासह पायीच गावाचा रस्ता धरला आहे. असेच चित्र वैजापूरजवळ असल्याचे यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. स्वाती वध यांनी युवक कॉंग्रेसचे महासचिव मानस पगार यांना सांगितले. मानस यांनी एनएसयूआयचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सागर सांळुके यांच्या माध्यमातून श्री. डोणगावकर यांच्यासोबत चर्चा केली.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात.. 

त्यानंतर मोबाईलव्दारे त्या चिमुकल्यांचे याचना करणारे चेहरे पाहीले आणि अस्वस्थ आलो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. सुत्रे हाती घेत त्यांनी सोमवारी (ता.चार) काँग्रेसचे वैजापूर तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील सदाफळ यांच्यावतीने कामगारांची भोजनाची, निवासाची सोय केली. नंतर उपविभागीय अधिकारी संदीप सानप यांच्या मदतीने वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. 

हेही वाचा : बोंबाबोंब झाल्यानंतर आली प्रशासनाला जाग

त्यांना गावी नेऊन सोडणार 
बुधवारी (ता.सहा) तीन क्रूझर गाड्यातून त्यांना त्यांच्या गावी सोडण्यात येणार आहे. प्रशासनाने तशी परवानगी दिली आहे. यासाठी डोणगावकर व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज ठोंबरे यांनी गाड्यांचे सर्व नियोजन केले आहे. 
खरे तर या सगळ्या लोकांना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदत, मार्गदर्शन अशी सर्व पातळीवरील व्यवस्था करायला हवी. पण तसे होताना दिसत नाही. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कामगारांना गावी सोडण्याच्या आवाहनाला साथ देत डोणगावकर, सदाफळ, ठोंबरे, वैजापूर शहराध्यक्ष काजी यांनी आपली भूमिका बजावल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

go to top