
सिडको प्रशासनाने जर देखभाल, दुरुस्ती, विकास कामे तसेच लेआउट बिल्डिंग परवानगीची कामे सुरू केले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा सिडको वाळूज महानगर बचाव कृती समिती तर्फे बैठकीत देण्यात आला.
वाळूज (जि.औरंगाबाद) : सिडको प्रशासनाने जर देखभाल, दुरुस्ती, विकास कामे तसेच लेआउट बिल्डिंग परवानगीची कामे सुरू केले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा सिडको वाळूज महानगर बचाव कृती समिती तर्फे बैठकीत देण्यात आला. सिडको प्रशासनाने सिडको वाळूज महानगर प्रकल्प रद्द करण्याचा ठराव ३ मार्चला राज्य शासनाकडे पाठविला आहे. तो ठराव शासनाने रद्द करून अपूर्ण सिडको वाळूज महानगर प्रकल्प पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
जोपर्यंत सक्षम स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात येत नाही तोपर्यंत सिडको प्रशासनाने काम करावे, अशी मागणी हजारो नागरिकांच्या सह्यांचे निवेदनासह सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या अनुषंगाने आंदोलनात्मक भूमिका का घेऊ नये, असे पत्र सिडको प्रशासनास तसेच पोलिस आयुक्त, वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिले आहे. या बैठकीत नागेश कुठारे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीला शीतल गंगवाल, नरेंद्र यादव, सुशांत चौधरी, मालकर गंगाराम, गणेश धाडवे, कमलाकर नारखेडे, नाना बडे, सुनील साळुंखे, राजेंद्र देव्हारे, प्रवीण पाटील, रोहिदास लोहार, पवन खैरे, प्रेम जाधव आदी नागरिकांची उपस्थिती होती.
संपादन - गणेश पिटेकर