esakal | पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

marath_kranti

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण उपसमिती सदस्यपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आली आहे.

पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवारांच्या घरावर मोर्चा काढत विचारणार जाब, मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षण उपसमिती सदस्यपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.तीन) मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने वडेट्टीवार यांच्या मुंबईतील घरावर मोर्चा काढुन त्यांना जाब विचारणार आहे, असेही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी सांगितले.

राजकारणामध्ये कोणालाच भविष्य नसते; ते ज्याचे त्याला घडवावे लागते, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवेंचा सल्ला


वडेट्टीवार हे ओबीसी व मराठा समाजात भांडण लावून राजकारण करत आहेत. दोन समाजात वाद निर्माण करून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मराठा क्रांती ठोक मोर्चा एकही सरकारी नोकर भरती व परीक्षा होऊ देणार नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नकोय कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहेत.

वडेट्टीवार हे जर मराठा समाजाच्या विरोधात बेताल वक्तव्य करत असतील तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. वडेट्टीवार जर आंदोलने-मोर्चे काढू अस म्हणत असतील तर ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत. फक्त ओबीसी समाजाचे नव्हे याचही त्यांनी भान ठेवायला हवेत असेही रमेश केरे पाटील यांनी सांगितले.
 

संपादन - गणेश पिटेकर

go to top