esakal | औरंगाबादचे जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होईना
sakal

बोलून बातमी शोधा

civil hospital aurangabad

सध्या जिल्हा रुग्णालयातील निम्मे सामुग्री ही उधारीवर इतर रुग्णालयांतून आणलेली आहे. प्रमुख यंत्रसामुग्री मिळाल्यावरच जिल्हा रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु करणे शक्‍य आहे. हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिल्याचे डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ठ केले.

औरंगाबादचे जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरु होईना

sakal_logo
By
योगेश पायघन

औरंगाबाद : चिकलठाणा जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) हस्तांतरणाला अडीच वर्ष सरले. ओपीडी सुरु होऊन दीड वर्ष झाले. तथापि, रूग्णालय अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेले नाही. मिनी घाटी पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी आवश्‍यक यंत्र सामुग्रीचा पुरवठा झाला नसल्याने रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु करता येत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ठ केले. तर यंत्रसामुग्री पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांच्याकडे बुधवारी (ता. 22) मांडल्या.

प्रधान सचिव डॉ. व्यास हे बुधवारी शहरातील मॅट कोर्टात न्यायालयीन कामानिमीत्त आले होते. दरम्यान, त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देत आढावा घेतला. डॉ. व्यास यांनी सुरूवातीला मिनी घाटीमध्ये नव्याने कार्यान्वित झालेल्या सिटी स्कॅन विभागाची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयाच्या कामकाजासह, जिल्हा अपंग पुर्नवसन केंद्राची पाहणी करत सिव्हील वर्कचाही आढावा घेतला.

हेही वाचा - ...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. ए. व्ही. भोसले, बालरोगतज्ज्ञ डॉ. संतोष नाईकवाडे, डॉ. पद्मजा बकाल, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. सध्या जिल्हा रुग्णालयातील निम्मे सामुग्री ही उधारीवर इतर रुग्णालयांतून आणलेली आहे. प्रमुख यंत्रसामुग्री मिळाल्यावरच जिल्हा रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु करणे शक्‍य आहे. हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिल्याचे डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी स्पष्ठ केले.

डीपीसीतून आठ कोटींची मागणी

जिल्हाधिकारी यांच्याकडे डिपीसीतून आठ कोटींची मागणी केलेली आहे. त्यात अनेस्थेशिया वर्क स्टेशनसह यंत्र व सामुग्रीचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयाच्या हाफकिनकडून यंत्रसामुग्री पुरवठ्यातील होणाऱ्या दिरंगाई बाबत मुंबईत गेल्यावर पाठपुरावा करु, असे आश्‍वासन डॉ. व्यास यांनी दिल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

मिळणाऱ्या सेवा लोकांना कळू द्या

मिनी घाटीत 16 स्लाईस सिटी स्कॅन यंत्र महिनाभरापुर्वी सुरु झाले. मात्र, तपासणी झालेल्या रुग्णांची संख्या कमी दिसल्याने डॉ. व्यास यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील सेवांची माहीती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या.