...तर संजय राऊतांचं तोंड वंगणानं काळं करू

maratha Kranti Thok Morcha
maratha Kranti Thok Morcha

औरंगाबाद : 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचे प्रयत्न सुरु असताना शिवसेनेने काय केले? खासदार संजय राऊत सतत मराठा समाजाबद्दल व्देष व्यक्‍त करीत आले आहेत. शिवरायांच्या वंशजाबद्दलही उलटसुलट बोलत आहेत. त्यांनी आपल्या तोंडाला लगाम लावावा, अन्यथा त्यांचे तोंड वंगणाने काळे करू,'' असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. 

मराठा समाजाच्या विविध प्रलंबीत मागण्यांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता.17) सकाळी मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात बैठक पार पडली. यावेळी अनेक युवकांनी आपले मनोगत व्यक्‍त केले.

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समन्वयक रमेश केरे म्हणाले, मराठा समाजाने आपल्या हक्‍कासाठी आंदोलने केल्यानंतर त्याची श्री. राऊतांनी खिल्ली उडवली होती. त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले आहेत. आता तरी त्यांनी सुधरायला हवे. जर ते मराठा समाजाला नडले तर कपडे फाटेपर्यंत फटके देण्यात येतील. शिवाय, तोंडाला काळे फासण्यात येईल. आत्तापर्यंत त्यांचे नाटक सहन केले, मात्र, आता त्यांचे हे नाटक कायमस्वरूपी बंद व्हायला हवे. 

देशभरात आंदोलने करूनही आजही समाजाचे प्रश्‍न मार्गी लागलेले नाहीत. दुसरीकडे शिवाजी महाराजांचा भाजपकडून अवमान होत असताना शिवसेनेचे नेते मुग गिळून का गप्प आहेत. कुठल्या शिवसैनिकांने रस्त्यावर उतरत आंदोलन केले? याचे उत्तर श्री. राऊत यांनी द्यावे? असे आव्हानही त्यांनी दिले. सदरील पुस्तक मागे घ्यावे, अन्यथा लेखकाचे देखील तोंड फोडण्यात येईल. शांततेच्या मार्गाने आंदोलने करून प्रश्‍न सुटत नसतील, तर हातात काठ्या घ्याव्या लागतील.

आंदोलनादरम्यान 42 समाज बांधवाने आपले जीवन संपविले. त्यांचा परिवार उघड्यावर आलेला असताना शासनाने त्यांच्या कुटूंबियांना काय मदत केली? त्यांच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी व 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, सारथीचे केंद्र औरंगाबादला स्थापन करावे, त्याशिवाय, या भागातील विद्यार्थ्यांना त्याचा फारसा फायदा होणार नाही. हे प्रश्‍न घेवून लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.

प्रलंबीत मागण्यांसाठी लवकरात लवकर उपसमिती स्थापन करावी, त्याचे अध्यक्षपद जाहीर करावे, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी राहुल पाटील, शैलेश भिसे, राजेंद्र धुरट, रविंद्र तुपे, किरण काळे, शुभम केरे, तेजस पवार, सतीश बचाटे, दत्ता भोकरे, लक्ष्मण मोटे, शुभम पाटील, तान्हाजी कऱ्हाळे, दत्ता भोकरे, शाम पाटील आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com