esakal | आता शहरातील गल्ल्यांमध्ये ही अनोळखींना नो एन्ट्री
sakal

बोलून बातमी शोधा

आता शहरातील गल्ल्यांमध्ये ही अनोळखींना नो एन्ट्री

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून काही गल्ल्यांमध्ये वाहनांची ये-जा होती. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे; मात्र दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अनेकांनी आता खबरदारी घेतली आहे. आपल्या कॉलनीत, गल्लीत अनोळखी व्यक्ती येऊ नये म्हणून नागरिकांनी स्वतःहूनच गल्ल्या बंद केल्या आहेत.

आता शहरातील गल्ल्यांमध्ये ही अनोळखींना नो एन्ट्री

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबादः लॉकडाऊननंतर आवश्‍यकता असेल तरच बाहेर फिरा असे आवाहन प्रशासन, पोलिसांकडून केले जात होते; मात्र काही या आवाहनाकडे मुद्दामहून दुर्लक्ष करीत होते; मात्र गुरुवारी (ता. दोन) शहरातील दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता नागरिकांकडून त्यांच्या कॉलनीतील गल्ल्या बंद केल्या जात आहेत. पोलिसांनी अगोदरच सिडको एन-चार आणि आरेफ कॉलनी परिसर सील केला आहे. 

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून काही गल्ल्यांमध्ये वाहनांची ये-जा होती. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे; मात्र दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अनेकांनी आता खबरदारी घेतली आहे. आपल्या कॉलनीत, गल्लीत अनोळखी व्यक्ती येऊ नये म्हणून नागरिकांनी स्वतःहूनच गल्ल्या बंद केल्या आहेत.

हेही वाचा- प्राणी संग्रहालयात हरणाचा बळी

काही ठिकाणी गाड्या आडव्या लावल्या आहेत. काही ठिकाणी बांबू टाकून रस्ता बंद केला आहे; तसेच गल्लीच्या मुख्य ठिकाणी तर काही जण बसले असून, ते बाहेरील व्यक्तीस येऊ देत नाहीत. शुक्रवारी (ता. तीन) मोठ्या संख्येने शहरातील अनेक कॉलनीमधील गल्ल्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या.

कुणीही घराबाहेर पडू नये अशा सूचना दिल्या जात आहेत; मात्र काही जण ऐकत नसल्याने आता वाहनांसाठी गल्ल्याच पूर्णबंद केल्या आहेत. सध्या काही जणांनी कोरोनाची चांगलीच धास्ती घेतली आहे. तर बहुतांश जण खबरदारी घेत आहेत