esakal | औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
sakal

बोलून बातमी शोधा

4thoratbalasaheb

नाव बदलण्याच्या विषयात काँग्रेसला रस नाही. सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे. काँग्रेसचे धोरण, त्यानुसार सरकारचे काम सुरू आहे.

औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्यास काँग्रेसचा विरोध, बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा विषय नाही. त्यामुळे संभाजीनगर नावाला काँग्रेसचा विरोध असेल असे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज गुरुवारी (ता.३१) औरंगाबाद येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिक स्पष्ट केली आहे.

नाव बदलण्याच्या विषयात काँग्रेसला रस नाही. सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे. काँग्रेसचे धोरण, त्यानुसार सरकारचे काम सुरू आहे. काँग्रेसची महापालिकेच्या ११५ जागा लढण्याची तयारी सुरू आहे. निवडणुकी संदर्भातील काही निर्णय राज्यस्तरावर चर्चेनंतर घेतले जातील असे त्यांनी सांगितले. आज एक दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर थोरात आले आहे.

संपादन - गणेश पिटेकर