मृत्युदराची पुन्हा उसळी, औरंगाबादेत दोन लाख ६४ हजार कोरोना चाचण्या निगेटिव्ह

माधव इतबारे
Wednesday, 11 November 2020

कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या मृत्युदराने प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी वाढत्या मृत्युदराने प्रशासनाचे टेन्शन वाढविले आहे. कोरोनाचा राज्याचा मृत्युदर २.६ टक्के आहे तर जिल्ह्याचे प्रमाण २.३ टक्के एवढे आहे. शहराचा सध्याचा दर ३.०२१ टक्के एवढा आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात शहरात कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. त्यात वाढत्या मृत्युदरामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

घरखर्चासाठी विवाहितेचा छळ; अखेर मायलेकींची आत्महत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

शहरातील कोरोनाचा मृत्युदर कधी काळी पाच टक्के एवढा होता. त्यामुळे मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मध्यंतरी मृत्युदराचे प्रमाण तीन टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. मात्र, आता पुन्हा हे प्रमाण तीन टक्क्यांच्या पुढे गेले आहे. महापालिकेने सोमवारी (ता. नऊ) दिलेल्या अहवालानुसार शहराचा मृत्युदर हा ३.०२१ टक्के एवढा आहे. जिल्ह्याचा मृत्युदर हा २.६ टक्के असून, राज्याच्या दर २.३ टक्के एवढा आहे.

दरम्यान, प्रतिदशलक्ष लोकसंख्येमागे कोरोना चाचणीचे शहराचे प्रमाण हे दोन लाख ५६ हजार ४५५ एवढे आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाख सात हजार ७४६ चाचण्या झाल्या आहेत. पैकी दोन लाख ६४ हजार १५५ नागरिकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या असून, २८ हजार ५७२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Date Rate Again Go Up In Aurangabad