औरंगाबादेत २८ संशयित होम क्वारंटाईन 

शेखलाल शेख
गुरुवार, 19 मार्च 2020

२० विद्यार्थ्यांचे गुरुवार (ता.१९) रोजी स्वॅब नमुने घेण्यात आले असून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाची टीम सतत या रुग्णांच्या संपर्कात आहे.  

औरंगाबादः शहरात ६ मार्च पासून १९३ रुग्णाची जिल्हा सामान्य रुग्णालयात स्क्रिनिंग करण्यात आली आहे. सध्या ३२ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून औरंगाबाद शहरात २८ संशयित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर चार रुग्णांवर उपचारा सुरु आहेत.

यामध्ये एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिजी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी गुरुवार (ता.१९) रोजी दिली. 
ज्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहेत.

हेही वाचा- आता गर्दी कराल तर गुन्हे दाखल होणार

शिवाय खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह महिलेची प्रकृती सुद्धा स्थिर आहे. शिवाय महिलेच्या संपर्कातील सर्वच जणांची तपासणी करण्यात आली आहेत. यामध्ये संपर्कातील २० विद्यार्थ्यांचे गुरुवार (ता.१९) रोजी स्वॅब नमुने घेण्यात आले असून या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून आरोग्य विभागाची टीम सतत या रुग्णांच्या संपर्कात आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Home Quarantine Aurangabad Sakal