कोरोनामुळे मृत्यूसत्र सुरूच, आज पुन्हा दोघांचा बळी, एकूण 41 रुग्णांचा मृत्यू 

मनोज साखरे
Thursday, 21 May 2020

औरंगाबादेत कोरोनाकंप सुरूच असून मृत्यूसत्रही थांबता थांबेना. रहेमानिया कॉलनी आणि आसेफिया कॉलनी येथील आणखी दोघांचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आणि घाटी रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी (ता. 21) दिली. 

औरंगाबाद: औरंगाबादेत कोरोनाकंप सुरूच असून मृत्यूसत्रही थांबता थांबेना. रहेमानिया कॉलनी आणि आसेफिया कॉलनी येथील आणखी दोघांचा कोरोना आणि इतर आजारामुळे मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा आणि घाटी रुग्णालय प्रशासनाने गुरुवारी (ता. 21) दिली. या दोन मृत्यूने एकूण बळींचा आकडा 41 वर पोचला आहे. यात खासगी रुग्णालयात 3 आणि उर्वरित घाटी रुग्णालयात झाले आहेत. 

40 वा बळी

रहेमानिया कॉलनीतील 65 वर्षीय पुरुषाला 20 मे रोजी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा सकाळी साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांचा बायलॅटरल न्यूमोनियाटीस ड्युटू कोविड -19,  हायपरटेन्शन यामुळे मृत्यू झाला.

हेही वाचा- नियम पाळा अन्यथा होऊ शकते ही कारवाई 

41 वा बळी

आसेफिया कॉलनीतील 48 वर्षीय पुरुषाला 19 मे रोजी घाटी घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. दरम्यान त्यांचा 20 मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांचा कोविड चाचणी अहवाल सांयकाळी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या मृत्यूचे कारण बायलॅटरल न्यूमोनियल सेप्सीस विथ सेफ्टीक शॉक विथ टाईप वन रेस्पायरेटरी फेल्युअर विथ टाईप टू डायबेटीस मेलिटस विथ हायपरटेन्शन विथ इचेमिक हार्ट डिसीज स्टेटस पोस्ट परक्यूटेनियस कोरोनरी अँजियोप्लास्टी हे कारण आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patient 2 Death In Aurangabad