औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढता... वाढता ... वाढे !

20coronavirus_105_0
20coronavirus_105_0

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील (ग्रामीण) भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे ग्रामीण भागात आता चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. बुधवारी (ता.१६) जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

त्यामध्ये गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ४२ रुग्ण, वैजापूर तालुक्यात ३१ रुग्ण आणि औरंगाबाद तालुक्यात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आता रुग्ण संख्येत भर पडली असून बुधवार पर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ११ हजार ८२ वर जाऊन पाच आकडी झाली आहे. तर यातील ८ हजार ९२८ रुग्णांवर उपचार करून त्यांची तब्बेत चांगली झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. बुधवार पर्यंत पॉझिटिव्ह १ हजार ९३७ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत तर २१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

आता जिल्ह्याचा (ग्रामीण) मृत्युदर २.० टक्के इतका झाला आहे.तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उल्हास गंडाळ यांनी दिली असून नागरिकांनी शासना तसेच आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व स्वतः ची तसेच कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

जिल्ह्यातील १३६८ पैकी ५०३ गावांत कोरोनाचा फैलाव !
औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार ३६८ गावांपैकी तब्बल ५०३ गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून याचे प्रमाण टक्के इतके झाले आहे. तर ५०३ गावांपैकी फक्त १८२ गावातच पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील ९ तालुक्यामध्ये आतापर्यंत ७६ हजारांवर चाचण्या करण्यात आलाय असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. १०) जिल्ह्यातील रुग्णसंख्या ७ हजार ७०० चार अंकी होती. ती आता पाच अंकी झाली आहे. तसेच गुरुवारपर्यंत ३४१ गांवात ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने बुधवार (ता. १६) पर्यंत नवीन १६२ गावांमध्ये घुसखोरी केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आता घबराहट निर्मण झाली असून आरोग्य विभागात अनुभवी व परिस्थिती सक्षमपणे हाताळू शकेल अशा कायमस्वरूपी आरोग्य अधिकाऱ्याची गरज असल्याची मागणी आता जात धरते आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com