कोरोनावर मात : प्राध्यापक महिलेस रुग्णालयातून सुट्टी 

शेखलाल शेख
सोमवार, 23 मार्च 2020

कोरोनाग्रस्त ५९ वर्षीय महिलेचे गुरुवारी (ता. १९) मार्च रोजी पुन्हा एकदा स्वॅब नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले गेले होते. या महिलेचा अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आल्याने या महिलेस आज सोमवार (ता.२३) रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

औरंगाबादः रशिया-कझाकिस्तानचा प्रवास करुन आलेल्या औरंगाबादेतील ५९ वर्षीय प्राध्यापक महिलेस कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा १४ मार्च रोजी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर ही महिला ठणठणीत बरी झाली असून आज सोमवारी दुपारी त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. अशी माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली. 

कोरोना पॉझिटीव्ह असलेली महिला बरी झाल्याने औरंगाबादेत केलेले उपचार यशस्वी झाले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा- समजून घ्या जमावबंदी आणि संचारबंदीतील फरक

औरंगाबादेत ५९ वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ झाली होती. महिला ज्या संस्थेत आहे तेथील सर्व विद्यार्थी कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचा जीव भांडण्यात पडला. त्यानंतर ५९ वर्षीय महिलेवर उपचार सुरु होते. कोरोनाग्रस्त ५९ वर्षीय महिलेचे गुरुवारी (ता. १९) मार्च रोजी पुन्हा एकदा स्वॅब नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठविले गेले होते. या महिलेचा अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आल्याने या महिलेस आज सोमवार (ता.२३) रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Update Aurangabad Breaking News