esakal | पुर्वी भीती जास्त आकडा कमी आता भीती कमी आकडा जास्त
sakal

बोलून बातमी शोधा

पुर्वी भीती जास्त आकडा कमी आता भीती कमी आकडा जास्त

औरंगाबाद शहरात अनलॉक मध्ये बाजारपेठेत सम-विषम प्रमाणात दुकाने सुरु आहे. खासगी कार्यालये सुद्धा दहा टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु झालीय. मात्र या सर्वांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचे आणि मृतांचे आकडे धक्का देणारे आहे. पुर्वी ज्या पद्धतीने लोक काळजी घेत लॉकडाऊनमध्ये घरातच होते तशी परिस्थिती आता नाही. बहुतांश जण बिनधास्तपणे बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे काही जण तर कामे नसेल तरी बाहेर पडताहेत.

पुर्वी भीती जास्त आकडा कमी आता भीती कमी आकडा जास्त

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: पहिल्या लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मनात कोरोनाची दहशत आता कमी झालीय. पुर्वी ज्या पद्धतीने बहुतांश जण वारंवार हात धुणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करत होते. त्याकडे आता काही जण दुर्लक्ष करतांना दिसताहेत. लॉकडाऊनंतर अनलॉक मध्ये नियमात शिथिलता दिल्याने अनेक ठिकाणी दुकाने, व्यवहार सुरु झालेय. काही जण निष्काळजीपणा करत गर्दीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याने कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा वाढलाय. सध्या पॉझिटीव्ह रुग्णांचा औरंगाबाद जिल्ह्यातील आकडा दोन हजारांच्या तर मृतांचा आकडा शंभरच्या पुढे गेला आहे. त्यातच काही दिवसांपुर्वी बंद केलेल्या गल्ल्या, गावे आता मोकळी करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरात अनलॉक मध्ये बाजारपेठेत सम-विषम प्रमाणात दुकाने सुरु आहे. खासगी कार्यालये सुद्धा दहा टक्के कर्मचाऱ्यांवर सुरु झालीय. मात्र या सर्वांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांचे आणि मृतांचे आकडे धक्का देणारे आहे. पुर्वी ज्या पद्धतीने लोक काळजी घेत लॉकडाऊनमध्ये घरातच होते तशी परिस्थिती आता नाही. बहुतांश जण बिनधास्तपणे बाहेर पडत आहे. विशेष म्हणजे काही जण तर कामे नसेल तरी बाहेर पडताहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला अडचणी येत आहे.

हेही वाचा- आता व्हेंटीलेटर असे होणार ऑपरेट वाचा सविस्तर

गर्दी कमी होईना

कोरोनाला थोपविण्यासाठी काळजी घेणे आणि अंतरामचे नियम पाळणे अतिशय आवश्‍यक आहे. नियमांच्या बाबतीत अनेक जण उदासीन दिसून आले. लॉकडाऊनमध्ये सुद्धा बाजारपेठ खुली झाली तर तेथे तोब गर्दी झाली होती. जीवनावश्‍यक वस्तु खरेदी करतांना काही जणांनी नियमच पाळले नाही. आता सम-विषम प्रमाणात बाजारपेठा खुल्या झाल्या तरीही बाजारापेठेतील गर्दी कमी नाही. काही ठिकाणी खरेदी करतांना अंतराचे नियम पाळले जात नाही. त्यामुळे कोरोनाला कुठुन आमंत्रण मिळेल हे कळत नाही. 

गल्ल्या, कॉलनी झाल्या मोकळ्या

सुरवातील बहुतांश जणांनी त्यांच्या कॉलनीतील गल्ल्या वाहतुकीसाठी बंद केल्या होत्या. पत्रे ठोकुन, लाकड टाकुन, दोरी बांधुन त्या बंद करण्यात आल्या होत्या. यातून साधी दुकाचे काढणे सुद्धा अवघड होते. एका गल्लीतील व्यक्ती दुसऱ्या गल्लीत जात नव्हता. मात्र आता नियम शिथिल होऊन व्यवहार सुरु झाल्याने बहुतांश गल्ल्या सुरु झाल्या आहेत. त्यातील पत्रे, लाकड काढण्यात आली. आता गल्लीतून कोण येते आणि कोण जाते याकडे कुणाचे फारसे लक्ष नाहीत. शिवाय लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालीय. त्यामुळे लोक याकडे गांभीर्याने घ्यायला तयार नाही.

ग्रामीण भागात ही पोहचला कोरोना

लॉकडाऊनच्या सुरवातीपासून बहुतांश गावांनी स्वतःहुन गावाच्या बाहेरील व्यक्तींना येण्यास सक्ती मनाई केली होती. गावाबाहेर कोणताही व्यक्ती येऊच शकत नव्हता. आला तरी त्याला ग्रामपंचायत मध्ये नोंद करावी लागत होती. शिवाय गावातील व्यक्ती आला तर त्यांना अगोदर आरोग्य प्रमाणपत्र घेऊन यावे लागत होते. आता मात्र बहुतांश गावांतील बंधने हटविण्यात आल्याने ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा पोहचला आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, गंगापुर, वैजापुर, पैठण, औरंगाबाद तालुक्यांमधील काही गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.