esakal | महत्त्वाची बातमी : आता व्हेंटिलेटर होणार मोबाईलद्वारे ऑपरेट 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी नवे संशोधन; वाचणार लाखो रुपये, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोनावरील उपचारासाठी ‘मोबाईल ऑपरेट व्हेंटिलेटर’ हे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार केले. या माध्यमातून कोविड रुग्णालयात किंवा वॉर्डाच्या बाहेर राहत डॉक्टर व्हेंटिलेटर ऑपरेट करू शकतात, अशी सुविधा या तंत्रज्ञानात आहे

महत्त्वाची बातमी : आता व्हेंटिलेटर होणार मोबाईलद्वारे ऑपरेट 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मोबाईल ऑपरेट व्हेंटिलेटरचे प्रात्यक्षिक दाखविताना डॉ. योगेश साठे. 

औरंगाबाद : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने कोरोनावरील उपचारासाठी ‘मोबाईल ऑपरेट व्हेंटिलेटर’ हे भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर तयार केले. या माध्यमातून कोविड रुग्णालयात किंवा वॉर्डाच्या बाहेर राहत डॉक्टर व्हेंटिलेटर ऑपरेट करू शकतात, अशी सुविधा या तंत्रज्ञानात आहे. सात ते आठ लाख रुपयांना येणारे व्हेंटिलेटर या शोधामुळे अडीच लाखांपर्यंत उपलब्ध होणार आहे. 

सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राणेश मुरनाळ, कर्मशाळा प्रमुख डॉ. योगेश साठे, विद्यार्थी सय्यद अशफाक यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी हे संशोधन तयार केले आहे. केंद्र सरकारने कोविड-१९ विषयी संशोधन करण्याचे आवाहन केल होते. त्याला प्रतिसाद देत व्हेंटिलेटरसाठी स्पेशल मोबाईल अॉप तयार केले आहे. 

अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 

या विषयी कर्मशाळा प्रमुख डॉ. योगेश साठे म्हणाले, ‘‘देशात पहिल्यांदाच हे तंत्रज्ञान तयार केले जात होते. पावसाळा-हिवाळा या दोन ऋतूंमध्ये कोरोना विषाणू कसा काम करेल, कसा पसरेल याचे आपल्याकडे मोजमाप करता येत नाही. हा जरी पसरला तरी त्यांची तयारी असावी या उद्देशाने भारतीय बनावटीचे व्हेंटिलेटर मशीन तयार केले आहे.

सात जन्म काय..सात सेंकंद देखील नको बायको आम्हाला |

 या मशीनमध्ये आयओटी तंत्रज्ञान आहे. हे व्हेंटिलेटर रेग्युलर मशीनपेक्षा वेगळे आहे. रेग्युलर व्हेंटिलेटर मशीनला मॉनिटर लागतो. त्यातच त्याचा डाटा जमा होतो. मात्र, या मशीनला मॉनिटर नसतो. हे संपूर्णपणे  अॉटाेमॉटीक मशीन आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाजवळ डॉक्टर व नर्स यांना पूर्ण वेळ थांबावे लागते. या मशीनजवळ थांबण्याची गरज नाही. 

असे करेल काम 
या मशीनच्या माध्यमातून उपचार सुरू असलेल्या रुग्णाबद्दल, त्याच्या स्थितीबद्दलची माहिती त्या व्हेंटिलेटर मोबाईल अॉप माध्यमातून डॉक्टरांना त्यांच्या मोबाईलमध्ये कळेल. यातून त्या रुग्णावर डॉक्टरचे लक्ष राहील. त्या रुग्णाचा डाटा शेअर करण्याची सुविधाही या अॉप माध्यमातून देण्यात आली आहे, असेही श्री. साठे यांनी सांगितले. यासह या मोबाईल ऑपरेट व्हेंटिलेटरची निर्मिती सुरू झाल्यास याला लागणाऱ्या वेगवेळ्या पार्टची मागणी वाढेल. परिणामी, हे पार्ट तयार करणारे नवीन उद्योग सुरू होतील, असेही डॉ. योगेश साठे यांनी सांगितले. 

go to top