esakal | Corona Updates: चिंताजनक! औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार
sakal

बोलून बातमी शोधा

corona condition in Aurangabad

- दोन हजार चार जणांचे गेले प्राण 
- ८२ हजार ७२३ कोरोनामुक्त, १५ हजार ४५७ रुग्णांवर उपचार 

Corona Updates: चिंताजनक! औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखाच्या पार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: तेरा महिन्यांपासू कोरोना संसर्गाच्या छायेत आपण जगत आलो आहोत. जगताना भोवताली अनेक बदल दिसले. तेरा महिने संसर्ग म्हणजे मोठा काळ यापुढेही काही काळ कोरोनासोबतच राहावे लागण्याची शक्यता आहे. मार्च २०२० मध्ये औरंगाबादेत पहिला कोरोनाबाधित आढळला व त्यानंतर आज हीच संख्या तब्बल एक लाख १८४ जण आतापर्यंत कोरोनाबाधित आढळली.

आपण एक लाखांचा दुर्दैवी टप्पा पार करु असे औरंगाबादकरांना वाटलेही नव्हते पण कोरोनाचा संसर्ग घरापर्यंत पोचलाच. त्याला हद्दपार करण्यासाठी आता लढाई आणखी तिव्र करावी लागणार असून काटोकार नियमांची अंमलबजावणी पुन्हा स्वतःपासून सुरु करावी लागणार आहे. 

कोरोनामुळे जीवनात अनेक बदल झाले. आप्तेष्ट, प्रियजन दुरावले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. माणसांतही दरी निर्माण झाली. जो-जो कोरोनाच्या कचाट्यात सापडला त्यातील बहुतांश जणांचे हाल झाले आहेत. आरोग्याच्या, आर्थिक, मानसिक आणि एकुणच जीवनाच्या बारीक सारीक सर्वच दृष्टीने हाल-हाल होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या १ लाख १८४ झाली. 
याच कोरोनामुळे जिल्ह्यातील २ हजार ४ लोकांचा मृत्यू झालाय (बहूतांश जणांना इतर आजारही कारणीभुत होते.) 

आज कोरोना....! 
औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १२) एकूण १ हजार ४९२ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाख १८४ झाली. आजपर्यंत एकूण २ हजार ४ जणांचा मृत्यू झाला. 

८२ हजारांवर कोरोनामुक्त 
औरंगाबाद जिल्ह्यात विविध रुग्णालय व होम आयसोलेशनमध्ये सध्या १५ हजार ४५७ रुग्णांवर उपचार घेत आहेत. आज १ हजार ३९३ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ८२ हजार ७२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही सुखद बाब म्हणावी लागेल. 

कोरोना मृत्यू 

घाटीत १३ जणांचा मृत्यू 

घाटी रुग्णालयात ढाकेफळ ता. पैठण येथील पुरुष (५३), पुंडलिकनगर गल्ली क्रमांक १० येथील पुरुष (६३), नंदनवन कॉलनी येथील पुरुष (८०), अंधारी ता. सिल्लोड येथील महिला (४३), बेगमपूरा येथील महिला (६७), पैठण गेट येथील पुरुष (५२), गारखेडा येथील पुरुष (२८), बेगमपूरा येथील पुरुष (४५), गोलेगाव ता. खुलताबाद येथील पुरुष (६५), फुलंब्री येथील पुरुष (४५), भावसिंगपूरा येथील महिला (६५), परसोडा ता. वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, लासूरगाव ता. वैजापूर येथील पुरुष (६३) येथील कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. 

खासगी रुग्णालयात १० जणांचा मृत्यू 

विनयकुंज, पावले गल्ली ता. पैठण येथील पुरूष ( ८२), गारज, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथील पुरूष (८६), माळी गल्ली, ढोरकीन, ता.पैठण येथील पुरूष (५४), पिंप्रीराजा वाणी ता. जि. औरंगाबाद येथील पुरूष (४२), अजब नगर, औरंगाबाद येथील पुरूष (८९), समर्थ नगर, औरंगाबाद येथील पुरूष (८१), एन- अकरा, हडको येथील पुरूष (८२), खिवंसरा पार्क, औरंगाबाद येथील पुरूष (८४), एन चार सिडको, औरंगाबाद येथील पुरूष (८६) हर्सुल, औरंगाबाद येथील पुरूष (७७) कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. 

कोरोना मीटर 
बरे झालेले रुग्ण - ८२७२३ 
उपचार घेणारे रुग्ण - १५४५७ 
एकुण मृत्यू - २००४ 

आतापर्यंतचे बाधित - १००१८४ 
 


 

go to top