कशाची संचारबंदी, औरंगाबाद शहरात आले एवढे प्रवासी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. मात्र शहरात येणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह विविध भागातून गेल्या चोवीस तासात शहरात ४८१८ लोक शहरात आले. महापालिकेतर्फे त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली. 

औरंगाबाद- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आहे त्या ठिकाणी थांबावे म्हणून, राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या सीमाही सील करण्यात आल्या आहेत. मात्र शहरात येणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. पुणे, मुंबई, नगर, नाशिकसह विविध भागातून गेल्या चोवीस तासात शहरात ४८१८ लोक शहरात आले. महापालिकेतर्फे त्यांची स्क्रिनिंग करण्यात आली. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर शहरात येणारे नागरिक, पर्यटक यांची कसून तपासणी केली जात आहे. विमानतळ, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, गोलवाडी नगरनाका, हर्सूल, केंब्रिज चौक अशा विविध ठिकाणी स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान रेल्वे, एसटी बस बंद झाल्याने महापालिकेने नगरनाका, केंब्रिज चौक आणि हर्सूल अशा शहराच्या प्रवेश करणाऱ्या ठिकाणांवर तपासणी सुरूच ठेवली आहे. सोमवारपासून (ता. २३) संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे शहरात येणाऱ्यांची संख्या कमी झाली पाहिजे मात्र मुंबई, पुणे, नगर याठिकाणांहून शहरात येणारे प्रवासी कायम आहेत. मंगळवारी शहरात तब्बल १६९२४ जण दाखल झाले. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारी दोन ते बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत ४८१८ लोक शहरात दाखल झाले. महापालिकेच्या नगरनाका गोलवाडी येथील स्क्रिनिंग सेंटरवर ४१५१, हर्सूल नाका येथे ५२२ आणि केंब्रीज चौक येथील स्क्रिनिंग सेंटरवर १४५ लोकांची स्क्रिनिंग करून त्यांना शहरात प्रवेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचाकोरोनाच्या सावटात गुडीपाडवा साजरा

अकरा जण क्वारंटाईन कक्षात 
महापालिकेच्या क्वारंटाईन कक्षात दोन दिवसांपूर्वी जॉर्डन येथून परतलेल्या आठ जणांना ठेवण्यात आले होते. बुधवारी आणखी तीन जणांना ठेवण्यात आले. याआधी कलाग्राम आणि इतर ठिकाणच्या क्वारंटाईन कक्षात अकरा जण ठेवण्यात आले होते. ही संख्या आता चौदा झाली आहे. या सर्वांना येथे चौदा दिवस येथे ठेवले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Virus News Aurangabad