esakal | Corona virus| वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

बोलून बातमी शोधा

medical exam news

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १९ एप्रिल ते ३० जूनदरम्यान एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार आहेत.

Corona virus| वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे १९ एप्रिल ते ३० जूनदरम्यान एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या स्थितीमुळे या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी रविवारी (ता. ११) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

आमदार सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ऑफलाईन पध्दतीने वैद्यकीय शाखेच्या परीक्षा होणार असून कोविड आजाराविषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन या परीक्षा होतील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. मात्र परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी कोरोना बाधित आहेत. परीक्षेला बसता यावे म्हणून लक्षणे असूनही अनेक विद्यार्थी कोरोना चाचणी करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

औसा-निलंगा मार्गावर गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात; लाखोंचा गुटखा...

आज वैद्यकीय शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी घरी आहेत. मात्र आता या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जावे लागणार आहे. तसेच वसतिगृहात एका खोलीत ३ ते ४ विद्यार्थी राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. शिवाय अभ्यासिकाही बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे.

त्यामुळे परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आगामी होणाऱ्या एमबीबीएस, बीडीएस आदी वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली.