
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी (ता.चार) दिवसभरात १०४ कोरोनाबाधित वाढले. रुग्णांची संख्या ४३ हजार ७६० झाली.
औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.चार) दिवसभरात १०४ कोरोनाबाधित वाढले. रुग्णांची संख्या ४३ हजार ७६० झाली. सध्या ९२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या १७२ जणांना आज सुटी देण्यात आली. एकूम ४१ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
Aurangabad Graduate Election Result Analysis : दिग्गज नेत्यांची हजेरी, तरीही भाजपचा पराभव
शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या)ः पुष्पनगरी समर्थनगर (१), सातारा परिसर (१), वर्धमान रेसिडेन्सी, गारखेडा (१), श्रीकृष्णनगर, एन ९ (१), नंदनवन कॉलनी, छावणी (१), विठ्ठलनगर, मुकुंदवाडी (१), कांचननगर पैठण रोड परिसर (१), मोतीवाला कॉलनी, चिकलठाणा (१), रेणुकानगर, शिवाजीनगर (१), उल्कानगरी (१), यशोधरा कॉलनी, सिडको (१), नवनाथ नगर, हडको (१), एन-९ हडको (१), गुलमोहर कॉलनी, एन ५ सिडको (१), दिशानगरी (१), मल्हार चौक (१), गजानन कॉलनी (१), भानुदासनगर (१), स्वप्ननगर (१), एन ४ सिडको (२), म्हाडा कॉलनी (१), बीड बायपास परिसर (१), छावणी पोलिस स्टेशन (१), स्नेहनगर, क्रांती चौक परिसर (१), संत गाडगे महाराज शहरी बेघर निवास, रेल्वेस्टेशन (१), कांचनवाडी(३), एन ८ सिडको (१), राजेशनगर बीड बायपास (१) सद्गुरू कृपा हौसिंग सो. (१), गारखेडा परिसर (१), बीड बायपास परिसर (१), अन्य (५१).
ग्रामीण भागातील बाधित : वाहेगाव, गंगापूर (१), वासडी, कन्नड (१), करमाड (१), मल्हारवाडी (३), लासूर स्टेशन (१), शिऊर बंगला, वैजापूर(१), फुलंब्री पोलिस स्टेशन (१), जानेफळ (१), अन्य (९).
ज्येष्ठ महिलेचा मृत्यू
औरंगाबादच्या देवळाई, बीड बायपास रोड भागातील ७७ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा गुरुवारी (ता. तीन) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला. जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार १५४ वर पोचली आहे.
Edited - Ganesh Pitekar