Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात १२० रुग्णांची भर, ४१ हजार १०९ कोरोनामुक्त

मनोज साखरे
Sunday, 29 November 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात शनिवारी (ता. २८) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार १८४ झाली.

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (ता. २८) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार १८४ झाली. सध्या एकूण ९३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ८९ जणांना सुटी देण्यात असून, दिवसभरात मृत्‍यूची नोंद झाली नाही. आजपर्यंत ४१ हजार १०९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

शहरातील बाधित
तापडियानगर (१), नवीन बसस्टँड (१), एन तीन सिडको (२), आनंदनगर (१), शहानूरवाडी (२), एन दोन (२), खडकेश्वर (२), खोकडपुरा (१), ऊर्जानगर (१), दशमेशनगर (१), भगतसिंगनगर (१), जवाहरनगर (२), गारखेडा (३), बालाजीनगर (२), खिंवसरा पार्क (५), उल्कानगरी (१), हर्सूल (१), माजी सैनिक कॉलनी, पडेगाव (१), भानुदासनगर (१), जय भवानीनगर (१), यशोधरा कॉलनी (१), सातारा परिसर (४), शिवशंकर कॉलनी (१), घाटी परिसर (१), शिवाजीनगर (२), शिवेश्वर कॉलनी, हर्सूल (२), मुलांचे वसतिगृह, घाटी परिसर (१), पुष्पनगर (१), पारिजातनगर (१), दशमेशनगर (१), प्रोझोन मॉल परिसर (२), हरिकृपा नगर, बीड बायपास (१), अन्य (३६)

ग्रामीण भागातील बाधित
शेंद्रा (३), जळगाव (१), बजाजनगर (२), दुधड (१), वाहेगाव (१), वाळूज एमआयडीसी (१), अन्य (२५)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ४१,१०९
उपचार घेणारे रुग्ण : ९३२
एकूण मृत्यू : ११४३
आतापर्यंतचे बाधित : ४३१८४

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 120 New Cases Reported In Aurangabad District