
औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी (ता.दोन) ७६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ हजार ७६२ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार २०६ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी ५७ जणांना सुटी झाली. आजपर्यंत ४४ हजार ७० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित (कंसात रुग्णसंख्या) : धूत हॉस्पीटल परिसर (२), जटवाडा रोड (२), एन सात (१), अरिहंत नगर (१), एन चार (१), अविष्कार कॉलनी (१), सावंगीकर हॉस्पीटल जवळ (१), एन नऊ (१), स्नेह नगर (२), मुकुंदवाडी (१), उत्तरानगरी (१), एसबीआय मुख्यालय परिसर (२), शाह नगर (१), भावसिंगपुरा (१), बीड बायपास (२), समर्थ नगर (२), इटखेडा (१), केंद्रीय विद्यालय, नगर नाका परिसर (१), कांचनवाडी (१), एन अकरा, गजानन नगर (१), पडेगाव (१), सेंट्रल नाका (१), अन्य (४१)
ग्रामीण भागातील बाधित : लासूर सावंगी (१), पैठण (१), कन्नड (१), अन्य (४)
एकाचा मृत्यू
घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील कल्याण नगरातील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कोरोना मीटर
---
बरे झालेले रुग्ण : ४४०७०
उपचार घेणारे रुग्ण : ४८६
एकूण मृत्यू : १२०६
----
आतापर्यंतचे बाधित : ४५७६२
----
संपादन - गणेश पिटेकर