
औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) दिवसभरात ७८ कोरोनाबाधित आढळले.
औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी (ता. ३०) दिवसभरात ७८ कोरोनाबाधित आढळले. रुग्णसंख्या ४३ हजार ३७८ झाली. सध्या ९९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ४१ हजार २४० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : बेगमपूरा (१), गजानन कॉलनी, गारखेडा (२), घाटी परिसर (१), पैठण रोड (१), चिनार गार्डन (१), गुरूप्रसादनगर, बीड बायपास (१), रेल्वे स्टेशन परिसर (३), अरिहंतनगर (३), उल्कानगरी (२), अन्य (४२), उस्मानपुरा (१), कासारीबाजार (२), नेहरू चौक (१), उस्मानपुरा (३), गारखेडा परिसर (१).
ग्रामीण भागातील बाधित : गंगापूर (१), कन्नड (२), अन्य (१०).
Edited - Ganesh Pitekar