Corona Update : औरंगाबादेत १२० कोरोनाबाधित, आतापर्यंत ९९९ जणांचा मृत्यू

मनोज साखरे
Monday, 12 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.११) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता.११) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५ हजार ३३२ झाली. आजपर्यंत एकूण ९९९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब संकलन पथकास २९ व ग्रामीण भागात २ रुग्ण आढळले. आज ३१४ जणांना घरी सोडण्यात आले. यात शहरातील २०४ व ग्रामीण भागातील ११० जणांना सुटी झाली. आजपर्यंत ३१ हजार २३० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

पाचवीच्या कार्यक्रमाला जाताना काळाचा घाला, मायलेकाचा अपघातात मृत्यू

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)
तोरणागड नगर (१), उस्मानपुरा (१), घाटी परिसर (२), महालक्ष्मी कॉलनी, ठाकरे नगर (१), बेगमपुरा (१), आंर्चागन, मिटमिटा (१), टिळक नगर (१), जालना रोड (१), सुराणा नगर (१), नक्षत्रवाडी (१),विश्वेश्वरया कॉलनी (१), हर्सुल, अशोक नगर (१), नक्षत्रवाडी (१), शरणापूर फाटा (१), एमजीएम हॉस्पीटल परिसर (२), मेहेर नगर, गारखेडा (१), हडको (१), सप्तपदी मंगल कार्यालय परिसर (१), शुभश्री कॉलनी (१), अविष्कार कॉलनी (१), बीड बायपास परिसर (३), जय भवानी नगर (१), एन सात सिडको (१), चिकलठाणा (१), श्रीकृष्ण नगर (१), माळीवाडी (१), बन्सीलाल नगर (१), महाजन कॉलनी (१), बजाज हॉस्पीटल परिसर (१), गादिया विहार (१), सिडको परिसर (१), हॉटेल ग्रीन ऑलिव्ह परिसर (२), हॉटेल फन रेसिडन्सी परिसर (१), अजंटा ऍ़म्बेसेडर परिसर (१), लेमन ट्री हॉटेल परिसर (१), इंडियाना रेस्टॉरंट परिसर (१), अमरप्रीत हॉटेल परिसर (१), चायनिज कॉर्नर परिसर (१), बग्गा इंटरनॅशनल परिसर (१), इंडियाना एक्जॉटिका (१), सिद्धार्थ नगर, केंब्रिज परिसर (१), पिसादेवी दत्त नगर (१), ब्रिजवाडी (१), कांचनवाडी (१), एन अकरा हडको (१), मयूर पार्क परिसर (१), अन्य (२)

औरंगाबादेतील खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी पॉलिमर तंत्रज्ञानाचा होणार वापर

ग्रामीण भागातील बाधित
कान्हेगाव, वारेगाव (१), लासूर स्टेशन, गंगापूर (१), जय भवानी नगर, सिल्लोड (१), चित्तेगाव, पैठण (१), नवी गल्ली, वैजापूर (१), वरझडी (१), इंद्रप्रस्थ कॉलनी (१), भराडी सिल्लोड (१), वाकला, वैजापूर (१), कचनेर (१), म्हाडा कॉलनी (२), नर्सरी कॉलनी, रांजणगाव (१), गुरू माऊली नगर, वडगाव (१), बाळासाहेब ठाकरे चौक, बजाज नगर (१), दत्त कॉलनी, वाळूज (१), हिदायत नगर, वाळूज (१), बाभूळगाव, मनूर (१), शिऊर वरचा पाडा (१), देवगाव, कन्नड (१),छाजेड नगर, कन्नड (१), भोलेश्वर कॉलनी, कन्नड (१), शेरोडी, कन्नड (१), शेंद्रा (३), रेलगाव, सिल्लोड (१), टिळक नगर, सिल्लोड (१), पालोद, सिल्लोड (१), जीवरग टाकळी, सिल्लोड (१), आमठाणा, सिल्लोड (१), टिळक रोड, वैजापूर (१), समिक नगर, वैजापूर (१), येवला रोड, वैजापूर (१), जाबरगाव, वैजापूर (१), असेगाव (१), वैजापूर (२)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ३१२३०
उपचार घेणारे रुग्ण  : ३१०३
एकुण मृत्यू : ९९९
----
आतापर्यंतचे बाधित : ३५३३२

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 120 Cases Recorded In Aurangabad