Corona Update : औरंगाबादेत १२० जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात ३३ हजार ५९४ जण झाले बरे

मनोज साखरे
Monday, 19 October 2020

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १८) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी (ता. १८) १२० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ हजार ५७६ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ३४ जणांचा मृत्यू झाला. सध्या १ हजार ९४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास २७ व ग्रामीण भागात पाच रुग्ण आढळले. आज २४३ जणांना सुटी झाली. यात शहरातील १२१ व ग्रामीण भागातील १२२ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत ३३ हजार ५९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

शहरातील बाधित (कंसात रुग्ण संख्या)

घाटी परिसर (१), अन्य (१), श्रेय नगर (२), शिवाजी नगर (१), इटखेडा (१), यशोदा हॉस्पिटल परिसर (१), पारिजात नगर (१), साई परिसर (२), उल्कानगरी (२), शांती नर्सिंग होम परिसर (१), वर्धमान रेसिडन्सी (१), पोलिस कॉलनी, चिकलठाणा (१), हरिओम नगर, जटवाडा रोड (१), सूतगिरणी चौक परिसर (१), सारा वैभव, जटवाडा रोड (१), श्रीविहार कॉलनी, देवळाई रोड (१), विजयंत नगर, देवळाई परिसर (१), एन सहा सिंहगड कॉलनी (१), मेहेर कॉलनी (१), निसर्ग कॉलनी (१), अविष्कार कॉलनी, एन सहा (१), जाधववाडी (३) दिवाणदेवडी (२), श्रीनगर, गारखेडा (१), निराला बाजार (१), विष्णू नगर (१), उत्तरानगरी, धूत हॉस्पीटल (१), रामगोपाल नगर, पडेगाव (२), सुपारी हनुमान रोड (१), एन सहा सिडको (१), ज्योती नगर, उस्मानपुरा (१), खडकेश्वर (१), मयूर पार्क (१),

ग्रामीण भागातील बाधित

वाळूज एमआयडीसी परिसर (२), बाबरा, फुलंब्री (१), लखमापूर, गंगापूर (२), भेंडाळा, गंगापूर (१), कलावती बोर्डिंग परिसर, बजाज नगर (१), साई श्रद्धा अपार्टमेंट, बजाज नगर (१), मातरगाव, गदाना (३), गणोरी, फुलंब्री (३), गिरीजा नगर, फुलंब्री (१), सावता मंदिर, फुलंब्री (१), सहारा कॉलनी, फुलंब्री (१), साठे नगर, वाळूज (२),शांती नगर, रांजणगाव (२), बकवाल नगर (१), पोलिस स्टेशन, वाळूज (१), म्हाडा कॉलनी, तिसगाव (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (२), धनगर गल्ली, खोडेगाव (३), श्रीराम कॉलनी, कन्नड (३), चाळीसगाव रोड, वाटर टँकजवळ, कन्नड (१), समर्थ नगर, कन्नड (३), लासूर स्टेशन (२), गोपालवाडी, गंगापूर (१), वाडी, गंगापूर (१), गंगापूर (५), नेवरगाव, गंगापूर (१), भवन सिल्लोड (१), शेलगाव, कन्नड (१), वडगाव को. (३), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (१), पैठण (१)

कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण : ३३५९४
उपचार घेणारे रुग्ण : १९४८
एकुण मृत्यू : १०३४
--------
आतापर्यंतचे बाधित : ३६५७६
-------

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 120 Cases Recorded In Aurangabad