esakal | Corona Update : औरंगाबादेत नवे १७५ कोरोनाबाधित रुग्ण, बरे झाले ३३२ जण
sakal

बोलून बातमी शोधा

3Corona_102

औरंगाबाद जिल्ह्यात मंगळवारी (ता.सहा) नवे १७५ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५६, ग्रामीण भागात ३० रुग्ण आढळले.

Corona Update : औरंगाबादेत नवे १७५ कोरोनाबाधित रुग्ण, बरे झाले ३३२ जण

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी (ता.सहा) नवे १७५ कोरोनाबाधित आढळले. अँटीजेन टेस्टमध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५६, ग्रामीण भागात ३० रुग्ण आढळले. उपचारानंतर बरे झालेल्या ३३२ रुग्णांना आज सुटी देण्यात आली.जिल्ह्यातील रुग्णसंख्या ३४ हजार ७२५ झाली असून चार हजार ९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २९ हजार ६५९ रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत ९७६ जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादकरांनो सावधान ! दहा पथके तैनात, तरीही वाहनचोरी जोरात! 


ग्रामीण भागातील बाधित
परिसर, (कंसात रुग्णसंख्या)ः शिळेगाव, गंगापूर (१), तीसगाव (२), पालखेड, बोरसर (४), गोलवाडी (२), बजाजनगर (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर (१), सारा संगम, बजाजनगर (१), छत्रपतीनगर, बजाजनगर (१), देवगिरीनगर, बजाजनगर (१), बजाजनगर (१), देवगाव, कन्नड (१), तालपिंपळगाव, कन्नड (१), खांडसरी परिसर, कन्नड (१), हसनाबादवाडी (३), सायगाव, पैठण (१), आनंदपूर, पैठण (१), नरसापूर, गंगापूर (१), धानोरा, गंगापूर (१), देवळी, गंगापूर (६), भोयगाव, गंगापूर (१), पानवडोद, सिल्लोड (१), भवन, सिल्लोड (२), स्टेशन रोड, वैजापूर (१), मारवाडी गल्ली, वैजापूर (१), शांतीनगर, कन्नड (१), भीलपलटण, कन्नड (२), लासूर गंगापूर (२), धामणगाव, फुलंब्री (१), भराडी (१), गोपीवाडा, पैठण (१), आंबेगाव, गंगापूर (१), औरंगाबाद (१), फुलंब्री (६), गंगापूर (३), कन्नड (८), खुलताबाद (६), पैठण (५), सोयगाव (१).

शहरातील बाधित
शिवशक्ती कॉलनी (१), एन-दोन सिडको (१), राधास्वामी कॉलनी (१), अन्य (२), रामनगर (२), गारखेडा (१), पिसादेवी रोड (१), जयभवानीनगर (२), एन-सात (१), साई हॉस्पिटलजवळ, समर्थनगर (२), जवाहर कॉलनी (१), एन-पाच सिडको (१), हनुमाननगर (२), उल्कानगरी (४), वसंतनगर (१), मेहेरनगर (१), एसआरपीएफ कॅम्प परिसर (१), एन-तेरा हडको (१), सिद्धेश्वरनगर, जाधववाडी (१), एन-सात सिडको (१), भावसिंगपुरा (२), बीड बायपास रोड (१), भवानीनगर (१), एन-तीन सिडको (२), खाराकुंवा (१) घाटी परिसर (१), राजेसंभाजी कॉलनी (२), गजानननगर (१), खडकेश्वर (१), एमजीएम हॉस्पिटल परिसर (१), कुंभारवाडा, एन-दोन (१), बालाजीनगर (१).

Edited - Ganesh Pitekar