औरंगाबादेत दिवसभरात ६५ जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यात ६९५ रुग्णांवर उपचार सुरू

प्रकाश बनकर
Sunday, 8 November 2020

औरंगाबाद  जिल्ह्यात रविवारी (ता.आठ) दिवसभरात ६४ रुग्णांची वाढ झाली. तर ८१ जणांना सुटी देण्यात आली.

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी (ता.आठ) दिवसभरात ६४ रुग्णांची वाढ झाली. तर ८१ जणांना सुटी देण्यात आली. आता ३९ हजार २८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ७९ झाली आहे. आतापर्यंत १ हजार १०३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहेत. जिल्ह्यात सध्या ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

यंदा विद्यार्थ्यांचा दीपोत्सव सूनासूना, कोरोनामुळे शाळा बंदचा परिणाम

महापालिका हद्दीत (कंसात रुग्णसंख्या)
अयोध्या नगर (१), एन चार सिडको (१), सूतगिरणी चौक (१), उल्कानगरी (१), समर्थ नगर (१), एन सात सिडको (१), सौजन्य नगर (१), सुभाश्री कॉलनी (१), श्रीनिवास नगर (२), नाईक नगर (१), गारखेडा (१), खोकडपुरा (१), जवाहर कॉलनी (१), माणिक कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड (२), कांचनवाडी (१), न्यू नंदनवन कॉलनी (१), सिद्धी हाइटस्, खिवंसरा (२), पोलिस कॉलनी, सिडको (१),अन्य (२०) असे एकुण ४१ रुग्ण अढळले आहेत.

ग्रामीणमध्ये दिवसभरात भेंडाळा, गंगापूर (२), मृत्यूंजय सो., बजाज नगर (१), ममनापूर (६), ग्लोबल सिटी, कमलापूर (१), शिक्षक कॉलनी, रांजणगाव (१), जामगाव, गंगापूर (१), पोलिस कॉलनी, वैजापूर (१), धानोरा, सिल्लोड (१), वसुंधरा कॉलनी (१), अन्य (८) असे एकुण २३ रुग्णांची भर पडली आहेत.

सह महिन्यानंतर थांबले रोज होणारे मृत्यू
राज्यातील कोरोना वाढलेल्या शहराच्या पहिल्या दहामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा समावेश होता. आता रुग्ण संख्या कमालीचे घटल्यामुळे कोरोनाच्या टॉप टेन यादीतून जिल्हा बाहेर पडला आहेत. जिल्ह्यात १३ मेपासून कोरोनामुळे रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होते. अखेर ६ महिन्यांनंतर कोरोना रुग्णांच्या मृत्यूला ब्रेक लागला आहे. रविवारी घाटीसह अन्य कोणत्याही रुग्णलयात रुग्णाचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid Positive 65 Cases Recorded In Aurangabad