esakal | शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Crop Destroyed due to heavy rainfall

मागील आठवड्यात खुलताबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पीकनुकसानीचा पंचनामा न करणाऱ्या शेतकऱ्यांची परवड थांबता थांबत नाही. कृषी विभाग, महसूल अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर अखेर पीकनुकसानीचा पंचनामा झाला खरा, नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळेलही; मात्र अरुंद नाल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने तो नाला शेतकऱ्यांनीच रुंद करून पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असा पवित्रा महसूल विभागाने घेतल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

शेतकरी संतापले, नुकसानभरपाई मिळेलही; पण ते होऊ नये याची हमी कोण घेणार?

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: मागील आठवड्यात खुलताबाद तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पीकनुकसानीचा पंचनामा न करणाऱ्या शेतकऱ्यांची परवड थांबता थांबत नाही. कृषी विभाग, महसूल अधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर अखेर पीकनुकसानीचा पंचनामा झाला खरा, नुकसानीची भरपाई सरकारकडून मिळेलही; मात्र अरुंद नाल्यामुळे शेतात पाणी घुसल्याने तो नाला शेतकऱ्यांनीच रुंद करून पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असा पवित्रा महसूल विभागाने घेतल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा- अल्पवयीन मुलीला पळवून नेले, गर्भवती केल्यानंतर न्यायालयात म्हणाला...

सुवर्णा बाळू जाधव या शेतकरी महिलेने सांगितले, की (शिवार गोळेगाव, ता. खुलताबाद) २४ जुलैच्या रात्री घोडेगाव-गोळेगाव (ता. खुलताबाद) शिवारात मुसळधार पाऊस झाल्याने अरुंद नाला असल्याने पाण्याचा प्रवाह शेतात आल्याने भाजीपाला पिकांचे एक एकर क्षेत्रावरील पूर्णपणे नुकसान झाले. क्षेत्रात मागील वर्षी अडीच लाख रुपये मिळाले होते. यंदा जवळपास एक लाखभर रुपयांचे नुकसान झाल्याचे सुवर्णा म्हणाल्या.

कृषी विभाग, महसूल झोपेतच
कृषी विभाग, महसूल अधिकाऱ्यांना कळवूनही न आल्याने कार्यालयांवर ठिय्या घेतल्याने संबंधित नुकसानीचा पंचनामा करण्यात आला; मात्र महसूलचे कोणीच अधिकारी आले नव्हते. मुळात सुवर्णा या आत्मांतर्गत क्रांती ज्योती शेतकरी गटाच्या सदस्या असल्याने आत्माचे अधिकारी पाठक यांच्यासह पल्लवी गायकवाड या संबंधित शेतकऱ्याच्या शेतावर गेल्यानंतर महसूलकडून पंचनामा करण्यात आल्याचे शेतकरी अरुण गोल्हार यांनी सांगितले.

हेही वाचा- आमदार कुचे यांच्यासह भाऊ, युवतीविरोधात गुन्हा दाखल, युवतीकरवी भाच्यालाच पाठविले अश्लिल संदेश  

त्यादरम्यान तलाठी यांनी कृषी पर्यवेक्षक श्री. तोरवणे यांना जाऊन पंचनामा करण्याचे सांगितल्यानंतरच पंचनामा झाला. त्याआधी का होऊ शकला नाही असा सवालही गोल्हार यांनी उपस्थित केला.

संबंधित प्रकरणाची चौकशी करून पावले उचलली जातील. याशिवाय सदर नाल्याचा नैसर्गिक प्रवाह शेतकऱ्यांनी बदलला की आधीपासूनच आहे, याचाही विचार करावा लागेल. तलाठी, पर्यवेक्षक यांच्यविषयी माहिती घेणार आहे.
- राहुल गायकवाड, तहसीलदार, खुलताबाद

मागील दहा वर्षांत असा पाऊस झाला नव्हता. तलाठी अप्पांनी आम्हाला ‘तुम्ही म्हणाल तसा पंचनामा करून घेता येईल’ असे सांगून कृषी पर्यवेक्षकांना पंचनामा करायला पाठविले. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह असो की शेतकऱ्यांनी केलेला असो. माहिती घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे.
- अरुण गोल्हार, अध्यक्ष, क्रांती ज्योती शेतकरी गट

हेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात कशी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात